शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेवर मनसेचा झेंडा

By admin | Updated: July 31, 2014 00:15 IST

विदर्भात सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येथील नगरपरिषदेवर आज बुधवारी आपला झेंडा फडकविला आहे. नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोनही पदे काबीज करून मनसेने नगरपरिषदेची सत्ता

वणी : विदर्भात सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येथील नगरपरिषदेवर आज बुधवारी आपला झेंडा फडकविला आहे. नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोनही पदे काबीज करून मनसेने नगरपरिषदेची सत्ता प्रथमच हस्तगत केली आहे.अडीच वर्षांपूर्वी झालेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण २५ सदस्यांपैकी मनसेचे सर्वाधिक आठ नगरसेवक विजयी झाले होते. त्या खालोखाल सात अपक्ष, चार राष्ट्रवादी, तीन शिवसेना, दोन कॉंग्रेस आणि एक नगरसेवक भाजपाचा विजयी झाला होता. सर्वाधिक आठ सदस्य निवडून येऊनही नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मनसेला चाट बसली होती. त्यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस, भाजप आणि चार अपक्षांनी एकत्रित येत नगरपरिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकविला होता. गेल्या अडीच वर्षाच्या काळात नगरपरिषदेत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. यावेळी नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या महिला सदस्याकरिता आरक्षित होते. या प्रवर्गातील करुण कांबळे आणि प्रिया लभाने या दोनच उमेदवार होत्या. त्यात कांबळे यांनी सत्ताधाऱ्यांकडून, तर लभाने यांनी मनसेकडून उमेदवारी दाखल केली होती. मात्र लभाने यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला होता. परिणामी ही निवडणूक लांबणीवर पडली होती. दरम्यान लभाने यांनी आयुक्तांकडे अपिल केले होते. तेथे आयुक्तांनी त्यांचा अर्ज वैध ठरविल्यानंतर आज बुधवारी नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोनही पदांसाठी निवडणूक घेण्यात आली.उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शिवानंद मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. विहित मुदतीत कुणीही अर्ज मागे न घेतल्याने कांबळे व लभाने यांच्यात लढत झाली. त्यावेळी सभागृहात २४ सदस्य उपस्थित होते. त्यापैकी २0 सदस्यांनी लभाने यांच्या बाजूने हात उंचावले, तर शिवसेनेचे तीन आणि एक अपक्ष, असे चार सदस्य तटस्थ राहिले. त्यामुळे लभाने यांची २0 विरुद्ध शून्य मताने नगराध्यक्षपदी निवड झाल्याचे मिश्रा यांनी घोषित केले. यानंतर उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी मनसेकडून अशोक बुरडकर, गटनेते अभिजित सातोकर, धनंजय त्रिंबके आणि विरोधकांतर्फे कॉंगेसचे कैसर पटेल आणि धनराज भोंगळे यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यापैकी बुरडकर वगळता सर्वांनी उमेदवारी मागे घेतल्याने बुरडकर यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोनही पदे काबीज करून मनसेने विदर्भात पहिल्यांदाच नगरपरिषदेची सत्ता ताब्यात घेतली आहे. मनसेने व्यूहरचना करून ही नगरपरिषद आपल्या ताब्यात घेण्यात अखेर यश प्राप्त केले. त्यानंतर मनसेने जल्लोष केला. (कार्यालय प्रतिनिधी)