शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

मारेगावात लोकप्रतिनिधीच बनताहेत गुत्तेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST

गावपातळीवर होणारी विकासकामे स्थानिक ग्रामपंचायत या एजन्सीमार्फत केल्या जाते. लोकप्रतिनिधींनी विकास कामांचा पाठपुरावा करून ही कामे गुणवत्तापूर्ण करून घेणे अपेक्षीत असते. परंतु तालुक्यात या विकासकामाचे ठेकेदार लोकप्रतिनिधीच बनल्याने विकासकामात अनियमितता येत असल्याची ओरड जनतेतून होत आहे. तालुक्यात मूलभूत सुविधाचा अभाव आहे.

ठळक मुद्देएजन्सी केवळ नामधारी, गावपातळीवरील विकास कामात मोठे घबाड, कामांचा दर्जा घसरतोयं

देवेंद्र पोल्हे ।लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : तालुक्यात गावपातळीवर मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. ही कामे नामधारी एजन्सीकडून होत असून प्रत्यक्षात राजकीय ठेकेदार आणि प्रशासनाच्या आशिर्वादाने होत असल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या कामाचा दर्जा तपासणारी यंत्रणा टक्केवारीत अडकल्याने कामाचा दर्जा तपासायचा कोणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.गावपातळीवर होणारी विकासकामे स्थानिक ग्रामपंचायत या एजन्सीमार्फत केल्या जाते. लोकप्रतिनिधींनी विकास कामांचा पाठपुरावा करून ही कामे गुणवत्तापूर्ण करून घेणे अपेक्षीत असते. परंतु तालुक्यात या विकासकामाचे ठेकेदार लोकप्रतिनिधीच बनल्याने विकासकामात अनियमितता येत असल्याची ओरड जनतेतून होत आहे. तालुक्यात मूलभूत सुविधाचा अभाव आहे. रस्ते, वीज, पाणी, नाली बांधकाम, स्मशानभूमी, भौतिक सुविधा या मुलभूत सुविधांसाठी जनता संघर्ष करित आहे. दरवर्षी या सुविधांसाठी शासन कोट्यवधी रूपये देऊनही दुय्यम दर्जाच्या कामामुळे समस्या सुटल्या नाही, हे वास्तव चित्र तालुक्यात उघडपणे पाहायला मिळते. गावपातळीवरील मुलभूत सुविधांसह अन्य कामे ग्रामपंचायत व शासनस्तरावर नोंदणीकृत एजंसीमार्फत टेंडर पद्धतीने केली जातात. परंतु तालुक्यात अधिकृत कंत्राटदार व एजन्सी केवळ नामधारी बनल्याचे दिसून येते. लोकप्रतिनिधींनी गावपातळीवर दिलेल्या निधीतून होणारी कामे निपक्ष न होता राजकीय गुत्तेदारच ही कामे करताना दिसतात. या गुत्तेदारांना अभय मिळत असल्याने कामाचा दर्जा निकृष्ट असतो. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या कामाची वाट लागलेली दिसून येते. खराब झालेल्या कामाचा पुन्हा दुरूस्तीचा देखावा करण्यात येतो. शासनाने ज्यांच्यावर कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी सोपविली आहे, ते कामाच्या गुणवत्तेपेक्षा कामावरील टक्केवारीवरच नजर ठेवून असतात. अशा विविध संकटात तालुक्याचा विकास अडकला आहे.कंत्राटदार केवळ नामधारीकंत्राटदार व काम करणाऱ्या एजन्सी ह्या नाममात्र झाल्या आहेत. अनेक तरूण कंत्रटदार बनले आहे. यातून त्यांना उदरनिर्वाह करण्यापुरते कसेतरी पैसे मिळत आहे. कंत्राटदार हा एखाद्या कामावर काम पाहणाºया व्यक्तीसारखे वागतात. त्यांना कामातले फारसे काही कळत नाही. त्यामुळे बरेचदा अंदाज पत्रकाप्रमाणे कामे होत नाही. अशा कामाचे सबंधीत एजंसीने नियमानुसार मुल्यांकन करून नियत्रंण ठेवणे गरजेचे असताना नियत्रंण ठेवणारी यंत्रणा आज बोगस कामांवर पांघरुन घालताना दिसते. कामे दिलेल्या नियमाने होत नसेल, तर अशा कामांची बिले अदा केली जाऊ नये. परंतु एखाद्या कामाचे टेंडर निघण्यापूर्वीच कामे करून बिले काढली जात आहे.मुल्यमापनात प्रचंड अनियमीतताकामांच्या गुणवत्तेची तपासणी करताना राजकीय दडपण आणि टक्केवारी या धोरणामुळे मुल्यमापन करणारे अभियंते आणि बिल काढणारे अधिकारी आहे. काम करणाऱ्या एजंसीला सर्वांची मर्जी सांभाळत विकासकामे करावी लागत असल्याने सहाजीकच गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. दर्जाहिन कामामुळे दिवसागणिक समस्या वाढत आहे. यासंबंधी जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा कामांची वाट लागल्या शिवाय राहणार नाही.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत