शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात ‘स्काडा’वर ६० कोटींच्या चुराड्याचा ‘मजीप्रा’चा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 20:00 IST

आवश्यक असेल तेथेच पैसा खर्च करा, असे शासनाचे आजचे धोरण आहे. तसे सर्व विभागाला निर्देश देण्यात आले. तरीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सद्यस्थितीत गरज नसलेल्या साहित्यावर सुमारे ६० कोटी रुपयांचा चुराडा करण्याचा डाव मांडला आहे. विदर्भात काम सुरू असलेल्या योजनांसाठी ‘स्काडा’ साहित्य खरेदीची तयारी केली जात आहे.

ठळक मुद्देगरज नसताना उठाठेवशासनाच्या खर्च कपातीच्या धोरणाला तिलांजली

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आवश्यक असेल तेथेच पैसा खर्च करा, असे शासनाचे आजचे धोरण आहे. तसे सर्व विभागाला निर्देश देण्यात आले. तरीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सद्यस्थितीत गरज नसलेल्या साहित्यावर सुमारे ६० कोटी रुपयांचा चुराडा करण्याचा डाव मांडला आहे. विदर्भात काम सुरू असलेल्या योजनांसाठी ‘स्काडा’ साहित्य खरेदीची तयारी केली जात आहे. वास्तविक या साहित्याची गरज योजनेच्या अखेरच्या टप्प्यात आहे.‘अमृत’ योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेल्या नवीन योजनांवर ‘स्काडा’ (सुपरविझनिंग कंट्रोल अ‍ॅन्ड डाटा आॅटोमायझेशन) यंत्र लावले जाणार आहे. पाण्याचा दाब, व्हॉल्व कंट्रोलिंग, पाण्याची टाकी किती भरली, कोणत्या भागात पाणीपुरवठा सुरू आहे, याची माहिती देणारे हे यंत्र आहे. जॅकवेलवर ते बसविले जाणार आहे. या यंत्राची गरज योजना पूर्ण झाल्यावर आहे. प्रत्यक्षात विदर्भात सुरू असलेल्या बहुतांश योजनांनी ६० टक्केही टप्पा गाठलेला नाही. किमान वर्ष-दीड वर्षाचा कालावधी योजना पूर्णत्वास जाण्यासाठी लागणार आहे. तरीही ‘स्काडा’ आणून टाकण्याची धडपड सुरू आहे.

यवतमाळकरिता ११ कोटीेंचे साहित्य खरेदीअमरावती जिल्ह्यातील दर्यापूर १५६ गावे व दोन शहर, नागपूर टेरी अर्बन व दहा गावे, बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व ४० गावे, वाशिम पाणीपुरवठा योजना आणि यवतमाळची अमृत पाणी पुरवठा योजना, या सर्व योजनांसाठी ‘स्काडा’ची सुमारे ६० कोटी रुपयांची यंत्र सामुग्री लागणार आहे. एकट्या यवतमाळकरिता ११ कोटी रुपयांचे साहित्य खरेदी केले जाणार आहे. या साहित्याची आवश्यकता आज नाही. यवतमाळचा विचार केल्यास किमान आणखी वर्र्ष-दीड वर्षे या साहित्याची गरज नाही. तरीही वरिष्ठ पातळीवरून एवढ्या मोठ्या रकमेचा चुराडा करण्याचा प्रयत्न होत आहे.

विदर्भासाठी ३०० कोटींचा ‘स्काडा’योजनेअंतर्गत पाण्याच्या पूर्ण झालेल्या टाक्या, पाईपलाईन पूर्ण होऊन झालेली टेस्टींग, जलशुद्धीकरण केंद्र, पंपींग मशीनरी आदींची कामे पूर्ण होऊन नळाला पाणी सोडण्याच्या तयारीपर्यंत योजना आल्यावर ‘स्काडा’ लावला जातो. पण इथे मात्र योजनेची अनेक कामे व्हायची असताना ‘स्काडा’ आणण्याची ‘गडबड’ केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाला यामुळे मोठी ठेच पोहोचण्याची भीती आहे. विदर्भासह राज्यात इतर ठिकाणी सुरू असलेल्या योजनांवरही शासनाने लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. सुमारे ३०० कोटींचा ‘स्काडा’ यासाठी लागणार आहे.निवृत्तीच्या तोंडावर ‘काम’ फत्तेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अमरावती विभागातील प्रमुख वरिष्ठ अधिकारी येत्या काही दिवसात सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या कार्यकाळात ‘स्काडा’ आल्यास ‘काम’ फत्ते करण्याच्या प्रयत्नात ते आहेत. साहित्य येऊन पडताच कंत्राटदाराला ७० टक्के रक्कम आठ दिवसात द्यावी लागेल. त्यामुळे आपल्याच काळात कंत्राटदाराचा ‘हिशेब’ चुकता झाल्याचे ‘पुण्य’ पदरात पडावे, यासाठी हा सर्व खेळ खेळला जात असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने या योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊनच ‘स्काडा’ खरेदीची परवानगी द्यावी, अशी अपेक्षा प्राधिकरण यंत्रणेतून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Governmentसरकार