शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीतील मुख्य घटक नामशेष

By admin | Updated: September 25, 2014 23:35 IST

आधुनिक युगात नवनवीन तंत्र वापरून कृषी विभागाने पिकांचे उत्पन वाढविण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर करण्यात येत असल्याने

रासायनिक खताचा परिणाम : शेती बंजर होण्याची भीतीगणेश रांगणकर -नांदेपेराआधुनिक युगात नवनवीन तंत्र वापरून कृषी विभागाने पिकांचे उत्पन वाढविण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर करण्यात येत असल्याने जमिनीतीत मुख्य पोषक तत्वेच आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी शेती बंजर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पूर्वी शेतकरी शेती व्यवसायाबरोबर गाय, म्हैस, बैल, शेळ्या आदी पाळीव जनावरे पाळत होते. या पाळीव जनावरांची विष्ठा शेतीसाठी उपयोगी येत होती. या जनावरांची विष्ठा शेणखत म्हणून शेतीकरिता उपयोगी पडत होती. जनावरांची विष्ठा खताचे काम करीत होती. हे शेणखत जमिनीसाठी अत्यंत पोषक ठरत होते. या खतापासून शेतजमिनीतील पोषक तत्वांना कोणतीही हानीसुद्धा पोहोचत नव्हती़ पूर्णपणे निरोगी पिकांपासून शेतकऱ्याला भाजीपाला व इतरही पिके घेत येत होती. त्यामुळे उत्पादनचा दर्जा अत्यंत चांगला राहात होता.यापूर्वी शेतकरी खंडीचा हिशेब लावून, खंडीने उत्पन्न झाले, अशी चर्चा करीत होते़ वयोवृध्द शेतकरी गावातील चौथऱ्यावर बसून उत्पादनाबाबत चर्चा करीत होते. पिकांवर कोणतेही संकट आले, की शेतकरी आपसात चर्चा करून त्यावर उपाययोजना करीत होते़ परंतु हल्लीच्या काळात तसे चित्र दिसून येत नाही. पिके चांगली राहण्याकरिता आता शेतकरी अधिकाधिक रासायनिक खताचा वापर करताना दिसत आहे़ त्यामुळे शेतजमिनीचा दर्जा घसरत आहे. जमिनीतील अत्यंत सुपिक तत्वे नष्ट होत आहे़ आता शेतकरी रासायनिक खताचा वापर जादा प्रमाणात करीत असल्याने उपजाऊ शेतजमिनी ओसाड पडण्याची शक्यता बळावली आहे़ शेतीत अधिकाधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतासोबतच अनेक प्रकारच्या महागड्या किटकनाशकांचाही अत्याधिक वापर होऊ लागला आहे. या किटकनाशकांमुळे शेतीतील ज्या वनस्पती पिकासाठी उपयोगी ठरतात, त्या वनस्पती व पोषक तत्वे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. किटकनाशकांच्या फवारणीमुळेत्यांना धोका निर्माण झाला आहे. वारंवार आणि अधिक रासायनिक खताच्या वापरामुळे शेतजमिनीलाही आता रासायनिक खतांची सवय झाली आहे़ आधुनिक काळात पिकांना रासायनिक खताचा डोज दिला नाही, तर उत्पादनात घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी त्यांचा वारेमाप वापर करताना दिसत आहे. अधिक उत्पन्नासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नाही. सिंचनाची सुविधा अत्यंत तोकडी आहे. यापूर्वी शेतकरी कोरडवाहू शेतात ‘वांगोडे’ तयार करून त्यामध्ये भाजीपाला लागवड करायचे़ त्याच भाजीपाल्यावर त्यांचा घरगुती खर्च अवलंबून असायचा. परंतु हल्लीच्या काळात मात्र कोरडवाहू शेतातून हे वांगोडे नष्टच झाले आहे़ अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कोरडवाहू शेतात भाजीपाला लावणेच बंद केले आहे़ आता तर शेतकरी, मजुरदारांसह सर्वच जनता रासायनिकयुक्त भाजीपाला खात आहे़ नवीन किटकनाशकांतील विषारी घटक भाजीपाल्यात मिसळत असल्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळत आहे. आता खास किटकनाशक निघाले. सोबतच शेतातील कचरा नष्ट करणारी औषधी आली आह़े त्यात जंगली जनावरांच्या हैदोसामुळे शेतकरी त्रस्त असल्याने ही जंगली जनावरे शेतात येऊ नये म्हणूनही अनेक शेतकरी खास औषधींची फवारणी करीत आहे. हे औषध धुऱ्याने फवारल्यास कोणतेही जनावरे शेतात शिरणार नाही, असा शेतकऱ्यांचा समज आहे़