शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

महायुती, आघाडीत संभ्रमावस्था कायम

By admin | Updated: September 17, 2014 00:03 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणी विधानसभा मतदार संघात शाखा स्थापनेचा धडाका सुरु केला. दररोज किमान १0 ते १२ गावांमध्ये शाखा स्थापन करण्यात येत आहे. दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये बंडखोरीची तयारी

वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणी विधानसभा मतदार संघात शाखा स्थापनेचा धडाका सुरु केला. दररोज किमान १0 ते १२ गावांमध्ये शाखा स्थापन करण्यात येत आहे. दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये बंडखोरीची तयारी सुरू असून महायुतीत उमेदवारीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.वणी विधानसभा मतदार संघात तूर्तास केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच निवडणूक तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. पक्षाने स्वतंत्रपणे नांदेपेरा मार्गावर ‘शिवनेरी’ नामक कार्यालयही सुरू केले आहे. या कार्यालयात दररोज कार्यकर्त्यांचा राबता सुरू झाला आहे. दररोज शाखा स्थापन करण्यासाठी मनसेच्या जिल्हा परिषद सदस्य अल्का टेकाम, पंचायत समिती सदस्य मिलींद पाटील व इतर पदाधिकारी जिवाचे रान करीत आहे. जिल्हाध्यक्ष राजू उंबरकर यांनी स्वत: निवडणुकीची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहे. दररोज पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. मनसेची निवडणूक तयारी सुरू असताना कॉंग्रेसमध्ये बंडखोरीची तयारी सुरू झाली आहे. विद्यमान आमदार वामनराव कासावार यांना त्यांच्याच गोटातील ‘विश्वासूं’कडून सुरूंग लावण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यातूनच येत्या शुक्रवारी १९ सप्टेंबरला काही ‘पत्ते’ उघड होण्याची शक्यता आहे. मात्र संभाव्य बंडखोरीही कासावार यांच्या पथ्यावर पाडण्यासाठीच केली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेसमध्ये एकमेव कासावार यांचेच नाव उमेदवारीसाठी पुढे आले असले, तरी निवडणुकीत ‘तिसरा’ प्रबळ उमेदवार राहण्यासाठीच व्यूह रचना आखली जात आहे.महायुतीत तर अद्याप संभ्रमावस्था कायम आहे. अद्याप महायुतीच झाली नसल्याने युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सैरभैर झाले आहे. त्यातच मुंबई, दिल्लीत जोरदार घडामोडी सुरू असल्याने युतीचे कार्यकर्ते युती तुुटणार की कायम राहणार, याबाबत साशंकीत आहेत. त्यातच युती झाली तरी उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. निष्ठावंत की नवखा, आपला की परका, घरचा की बाहेरचा, युतीचा उमेदवार नक्की कोण, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. स्पर्धेतील मातब्बर उमेदवारही अद्याप संभ्रमातच आहे. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व्दिधा मनस्थितीत दिसत आहे.महायुतीचे जागा वाटप रखडल्याने भाजपानेही आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. तथापि भाजपातही उभे दोन गट दिसून येत आहे. युती तुटल्यास भाजपचा उमेदवार नक्कीच मैदानात राहणार आहे. मात्र तो कोण असेल, हे युती तुटल्यानंतरच कळणार आहे. दुसरीकडे महायुती झालीच अन् शिवसेनेने ‘दुसऱ्या’च उमेदवाराला उमेदवारी बहाल केली, तर काय करायचे याचा खलही भाजपात सुरू आहे. लोकसभेत अहीर यांना विरोध करणाऱ्यांच्या पाठीशी कसे राहावे, असा प्रश्न भाजपामध्ये उपस्थित केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)