शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Maharashtra Election 2019 ; यवतमाळ मतदारसंघात भाजपचे मदन येरावार २२५३ मतांनी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 6:00 AM

सुरुवातीला काँग्रेसकडे लीड होता. नंतर हळूहळू भाजपाच्या बाजूने जनमताचा कौल जात असल्याचे मतमोजणीतून पुढे आले. पोस्टल मतदानापैकी ८७९ मते काँग्रेस उमेदवाराला मिळाली, तर ५०८ मते भाजपचे मदन येरावार यांना आहे. याशिवाय अपक्ष व शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संतोष ढवळे यांनी ३८ हजार ३४५ मते घेतली. निवडणूक मतमोजणी दरम्यान पाच इव्हीएम मशीन बंद पडल्या होत्या.

ठळक मुद्देअधिकृत घोषणेची रात्री उशिरापर्यंत करावी लागली प्रतीक्षा : भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, फेरमतमोजणीची मागणी

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजप उमेदवारात थेट लढत झाली. भाजपचे विद्यमान मंत्री मदन येरावार यांना काँग्रेस उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांनी जोरदार टक्कर दिली. मतमोजणीच्या २६ व्या फेरीपर्यंत मांगुळकर यांचे मताधिक्य कायम होते. मात्र नंतर मदन येरावार यांनी कमबॅक करत काँग्रेसचा लीड भरून काढत आघाडी घेतली. ३० फेऱ्या पूर्ण झाल्या तेव्हा येरावार यांच्याकडे दोन हजार २५३ मतांची आघाडी होती. निवडणूक निकालाबाबत अधिकृत घोषणा रात्री उशिरापर्यंत झाली नाही.मतमोजणीच्या ३० फेऱ्या झाल्या. त्यामध्ये सुरुवातीला काँग्रेसकडे लीड होता. नंतर हळूहळू भाजपाच्या बाजूने जनमताचा कौल जात असल्याचे मतमोजणीतून पुढे आले. पोस्टल मतदानापैकी ८७९ मते काँग्रेस उमेदवाराला मिळाली, तर ५०८ मते भाजपचे मदन येरावार यांना आहे. याशिवाय अपक्ष व शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संतोष ढवळे यांनी ३८ हजार ३४५ मते घेतली.निवडणूक मतमोजणी दरम्यान पाच इव्हीएम मशीन बंद पडल्या होत्या. त्याची मतमोजणी स्वतंत्ररित्या घेण्यात आली. यामध्ये कोण्या उमेदवाराला किती मते मिळाली हे जाहीर करण्यात आले नाही. याउपरही भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील सर्वच प्रमुख चौकात आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. काही ठिकाणी ढोलताशे वाजवून विजयाचा मनमुराद आनंद घेण्यात आला. निकालाबाबत अधिकृत घोषणा वृत्त लिहिपर्यंत झाली नव्हती.विजयाची तीन कारणे...1भाजपा उमेदवाराला ग्रामीण भागातून विशेष करून बोरीअरब, अकोलाबाजार या परिसरातून मोठ्या प्रमाणात साथ मिळाली. त्यामुळेच काँग्रेसचे मताधिक्य पुढे कमी झाले.2मतदारसंघातील विकास कामांचा मुद्दा पुढे करून ती पूर्ण करण्यासाठी पुन्हा संधी द्या, असे भावनिक आवाहन भाजपने केले होते.3काँग्रेसला पारंपरिक मते भाजपला जाण्यापासून रोखण्यात अपयश आले. त्यामुळे शहरातील बहुतांश मतदान केंद्रांवर भाजप उमेदवाराने मते घेतली.विकासाकरिता सदैव तत्परयवतमाळकरांनी मला पुन्हा दिलेल्या संधीचा पुरेपूर वापर करत विकास कामे पूर्णत्वास नेण्यावर भर दिला जाईल. हा विजय जनसामान्यांसह कार्यकर्त्यांचा आणि पक्षातील ध्येय धोरणाचा आहे.- मदन येरावार, भाजपजनतेचा प्रचंड मतांचा आशीर्वादजनतेने एक लाख ३६ हजार मतांचा प्रचंड आशीर्वाद दिला आहे. चौथ्यांदा सेवक म्हणून माझी निवड केली आहे. समाजसेवेचं व्रत घेऊन वाटचाल करत आलो. मतदारसंघाच्या विकासासाठी आणखी जोमाने काम करणार.- संजय राठोड, शिवसेनासर्वसामान्य जनतेचा विजयपाच वर्षात विकासाची अनेक कामे केलीत. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले. सर्वांसोबत प्रेम आणि आपुलकीची वागणूक होती. मंत्री असलो तरी कधी मंत्रिपदाचा आव आणला नाही. त्यामुळे हा विजय जनतेचा आहे.- डॉ.अशोक उईके, भाजपपराभवाचे चिंतन करूकाँगे्रस कार्यकर्त्याने निवडणुकीत विजयासाठी खूप परिश्रम घेतले. पाच जागांपैकी काही जागा अतिशय कमी फरकाने गेल्या. विजयी उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. पराभवाच्या कारणांचे विवेचन करण्यात येईल.- आमदार डॉ. वजाहत मिर्झा, काँग्रेस जिल्हाध्यक्षअगदी थोड्या फरकाने पराभवकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पुसदची जागा कायम राखली. मात्र यवतमाळ, आर्णी, उमरखेड, वणी येथे कमी मताने पराभव झाला. जनमताचा कौल सत्तेविरोधातच आहे. वेळेवरच्या समीकरणाने मतांचे विभाजन झाले.- आमदार ख्वाजा बेग, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसजिल्ह्यातील शेतकरी भाजपसोबतइतर जिल्ह्याप्रमाणे येथील शेतकऱ्यांनी रोष प्रगट केला नाही. ते भाजपसोबतच राहिले. आता त्यांना भाजपने न्याय द्यावा. पालकमंत्र्यांना चांगला निरोप मतदारांनी दिला आहे. स्वभाव बदलवून ते विनम्रता अंगिकारतील अशी अपेक्षा आहे.- किशोर तिवारी, शेतकरी नेते

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ