शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; उमरखेडच्याही भाजप आमदाराला ‘डच्चू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 06:00 IST

जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपचे आहेत. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सुमारे दीड वर्षांपूर्वी केलेल्या पहिल्याच सर्वेक्षणात जिल्ह्यातील आर्णी व उमरखेडचे आमदार ‘रेडझोन’मध्ये असल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासूनच या दोन्ही आमदारांचे तिकीट कापली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : नगराध्यक्ष नामदेव ससाने यांना उमेदवारी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भाजपने आर्णी पाठोपाठ उमरखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेंद्र नजरधने यांचे तिकीट कापले आहे. तेथील उमेदवारी आता उमरखेडचे नगराध्यक्ष नामदेव ससाने यांना देण्यात आली आहे.उमरखेड मतदारसंघाच्या उमेदवारीचा वाद दूरपर्यंत पोहोचला होता. रिपाइंनेही या मतदारसंघावर दावा सांगितला होता. मात्र रिपाइंचा अडसर दूर झाल्यानंतर भाजपचा उमेदवार कोण असा मुद्दा पुढे आला. बुधवारी रात्री जारी झालेल्या भाजप उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत आमदार राजेंद्र नजरधने यांचा पत्ता साफ करण्यात आला आहे. तेथे नगराध्यक्ष ससाने यांना रिंगणात उतरविले गेले. भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांची या फेरबदलामध्ये महत्वाची भूमिका राहिल्याचेही भाजपच्या गोटातून सांगितले जाते. तिकीट कापल्याने आता नजरधने पक्षासोबत राहतात की वेगळा काही विचार करतात हे पाहणे महत्वाचे ठरते.जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपचे आहेत. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सुमारे दीड वर्षांपूर्वी केलेल्या पहिल्याच सर्वेक्षणात जिल्ह्यातील आर्णी व उमरखेडचे आमदार ‘रेडझोन’मध्ये असल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासूनच या दोन्ही आमदारांचे तिकीट कापली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही आमदारांनी ५८ ते ६० हजार मतांची आघाडी पक्षाच्या उमेदवाराला मिळवून दिल्याने त्यांना जीवदान मिळेल अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु प्रत्यक्षात या मतांच्या आघाडीचा आर्णीचे आमदार राजू तोडसाम व उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने यांना कोणताही लाभ झाला नसल्याचे दिसते. या मतांच्या आघाडीनंतरही पक्षाने त्यांना तिकीट नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. तोडसाम बंडखोरीच्या तयारीत आहेत. आता नजरधनेही तोच पावित्रा घेतात काय याकडे नजरा लागल्या आहेत.दिग्रसमध्ये तारिक लोखंडवाला राष्ट्रवादीचे उमेदवारशिवसेनेचे वर्चस्व असलेल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने आपली उमेदवारी तारिक लोखंडवाला यांना दिली आहे. या जागेसाठी माजी खासदार उत्तमराव पाटील यांचे पुत्र राजू पाटील यांचे नाव अखेरपर्यंत रेटले गेले. मात्र गुरुवारी जारी झालेल्या यादीत तारिक लोखंडवाला यांना स्थान देण्यात आले. राजू पाटील यांना राष्ट्रवादींच्या श्रेष्ठींनी पसंती दर्शविली नसल्याचे स्पष्ट होते.पुसदमध्ये नाईक बंधूंमध्ये रंगणार सामनासंपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पुसद विधानसभा मतदारसंघात नाईक विरुद्ध नाईक असा सख्ख्या चुलत भावांमध्ये सामना रंगणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला असलेला पुसद मतदारसंघ भाजपने आपल्याकडे खेचून घेतला आहे. तेथे विधान परिषद सदस्य अ‍ॅड. नीलय नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वास्तविक नीलय यांचा ही उमेदवारी आपल्या पुतण्याला मिळावी असा आग्रह होता. त्यांचा हा आग्रह पाहून भाजपने अखेरच्या क्षणी दोन चेहऱ्यांवर लक्ष केंद्रीत करून त्यांचे सर्वेक्षणही तातडीने मागितले होते. मात्र पुन्हा वरच्या स्तरावर सूत्रे फिरली आणि भाजपच्या उमेदवारी माळ नीलय नाईकांच्या गळ्यात पडली. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान आमदार मनोहरराव नाईक यांचे पुत्र इंद्रनील यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीसोबतच नाईक कुटुंबीय आणि विशेषत: इंद्रनील यांच्या पक्षांतराच्या तमाम चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पुसदमध्ये आता नीलय नाईक विरुद्ध इंद्रनील नाईक असा सख्ख्या चुलत भावांमध्ये राजकीय सामना दिसणार आहे.

टॅग्स :umarkhed-acउमरखेड