शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; विधानसभा निवडणुकीची आज होणार मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

सात विधानसभा क्षेत्रातून आमदार निवडण्यासाठी १४ लाख ३९ हजार ३६० मतदारांनी आपला हक्क बजावला. निवडणूक रिंगणात असलेल्या ८७ उमेदवारांनी आपली भूमिका मतदारांपुढे मांडली. आता जनमताचा कौल कुणाच्या बाजूला हे दिसण्याची वेळ आली आहे. निवडणूक निकालाबाबत मतदानानंतर अनेकांनी तर्कवितर्क लावले.

ठळक मुद्दे८७ उमेदवारांचा फैसला : काऊंट-डाऊन सुरू, निकालाची उत्सुकता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीची लढत झाली आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या ८७ उमेदवाराच्या भाग्याचा फैसला गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू होणाऱ्या मतमोजणीने ठरणार आहे. प्रत्येकच मतदारसंघातील निकालाची उत्सुकता जनमाणसाला लागली आहे. विधानसभा मतदारसंघ मुख्यालयी मतमोजणी होणार आहे.सात विधानसभा क्षेत्रातून आमदार निवडण्यासाठी १४ लाख ३९ हजार ३६० मतदारांनी आपला हक्क बजावला. निवडणूक रिंगणात असलेल्या ८७ उमेदवारांनी आपली भूमिका मतदारांपुढे मांडली. आता जनमताचा कौल कुणाच्या बाजूला हे दिसण्याची वेळ आली आहे. निवडणूक निकालाबाबत मतदानानंतर अनेकांनी तर्कवितर्क लावले. अगदी बुथनिहाय मतदानाच्या टक्केवारीवरून विजयाचे समीकरण कसे जुळले हे समर्थक व कार्यकर्ते चौकात रंगणाऱ्या चर्चेत सांगत होते. चुरशीच्या लढतीमुळे काही काळ सट्टा बाजारातही अनिश्चितता व शांतता पहायला मिळाली. त्याचाही आधार घेऊन विजयाचे आराखडे बनविण्यात आले. राज्यस्तरावरच्या एक्झिट पोलचा हवाला देऊन आपणच विजयी उमेदवार असल्याचा दावा अनेकांनी केला.गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतदान केंद्राच्या संख्येवरून मतमोजणीच्या फेºया ठरल्या आहेत. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान केंद्र असल्याने येथे ३० मतमोजणीच्या फेºया होणार आहे. मोजणीची प्रक्रिया सकाळी ८ वाजता सुरू झाल्यानंतर साधारणत: दुपारी ३ च्या पुढे जनमताचा कौल कुणाच्या बाजूला हे चित्र स्पष्ट होणार आहे. यवतमाळ, दिग्रस, पुसद या मतदारसंघांमध्ये कमी अधिक प्रमाणात थेट लढतीचे चित्र पहायला मिळाले. उमरखेड, वणी, आर्णी, राळेगाव येथे प्रबळ दावेदार रिंगणात असल्याने बहुरंगी लढत पहायला मिळाली. आता जनमताने कोणता कौल दिला यावरूनच या उत्सुकतेच्या ठरलेल्या लढतीचे निकाल हाती येणार आहे.मोबाईल अ‍ॅपवर निकालाचे अपडेटनिवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रिया ही ऑनलाईन केली आहे. मतमोजणीचा फेरीनिहाय निकालाचे अपडेट मोबाईल अ‍ॅपवर बघता येणार आहे. मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून व्होटर हेल्पलाईन हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यास नागरिकांना घरबसल्या मतमोजणीचे अपडेट घेता येणार आहे. याशिवाय राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरूनही लाईव्ह निकाल पाहता येणार आहे. मतमोजणी केंद्राभोवती गर्दी टाळण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ