शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीतही महालक्ष्मी उपाशीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST

येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लक्ष्मीबाई पडघने नामक महिला गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करते. तिला आजपर्यंत कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. लहान मुलांच्या खेळण्यासारखे तिचे घर आहे. घराला भींतही नाही. तिच्या घरात बसूनच जावे लागते. पतीच्या निधनानंतर काही वर्षांपूर्वी तिच्या तरूण मुलाचेही निधन झाले. घरात कमावते कोणीही नाही. त्यामुळे शेतात मोलमजुरी करून ती आपले दिवस काढात आहे.

ठळक मुद्देमदतीपासून वंचित । ढाणकी येथील लक्ष्मीबाईची ससेहोलपट सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कढाणकी : दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरोघरी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीची कृपादृष्टी राहावी म्हणून यथासांग विधीवत पूजन होते. मात्र समाजातील अनेक लक्ष्मी आजही एकवेळच्या जेवणासाठी संघर्ष करीत आहेत. येथील लक्ष्मीबाईचीही ससेहोलपट सुरू आहे. शासकीय मदतीपासूनही ती वंचित आहे.येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लक्ष्मीबाई पडघने नामक महिला गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करते. तिला आजपर्यंत कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. लहान मुलांच्या खेळण्यासारखे तिचे घर आहे. घराला भींतही नाही. तिच्या घरात बसूनच जावे लागते. पतीच्या निधनानंतर काही वर्षांपूर्वी तिच्या तरूण मुलाचेही निधन झाले. घरात कमावते कोणीही नाही. त्यामुळे शेतात मोलमजुरी करून ती आपले दिवस काढात आहे.गेल्यावर्षी दिवाळीत काही समाजसेवकांनी तिला साडी व घरी उरलेला चिवडा देऊन आपला मोठेपणा दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा भाकरीचा प्रश्न सोडविण्याच्या भानगडीत कोणीही पडले नाही. शासनच्या योजनाही तिच्यापर्यंत पोहोचल्या नाही. अशा लोकांसाठी विविध योजना असते. मात्र त्या खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत का पोहोचत नाही, असा प्रश्न आहे. प्रत्येकवेळी कागदपत्रे अपुरी असल्याने योजनेचा लाभ मिळणार नाही, एवढेच उत्तर त्यांच्या कानी पडते.मागीलवर्षी उमरखेड येथील तत्कालीन तहसीलदारांनी लक्ष्मीबाई पडघणे यांच्या परिस्थितीची दखल घेत तिला तातडीने श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळावा म्हणून यंत्रणा कामी लावली होती. मात्र त्यांची बदली होताच यंत्रणा सुस्तावली. परिणामी लक्ष्मीबाईच्या कागदांची फाईल कोठे अडली, हे आजपर्यंत तिलाही कळलेच नाही.बोगस लाभार्थ्यांनाच मिळतो लाभअनेक धडधाकट आणि बोगस लाभार्थी खोटी कागदपत्रे तयार करून शासकीय योजना लाटतात. काही महाभाग अशांना सरकारी योजना मिळवून देतात. मात्र खरे गरजवंत एकवेळच्या जेवणासाठी संघर्ष करतात. लक्ष्मीबार्इंची भेट घेतली असता तेव्हा तिने एकच प्रश्न केला. ‘खरच मला मदत मिळेल का’, या निरागस प्रश्नाने आम्हीही हादरून गेलोे.

टॅग्स :government schemeसरकारी योजना