शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

मानवाचे जगणे आनंदाच्या शोधासाठीच

By admin | Updated: November 16, 2016 00:30 IST

आनंद प्राप्तीची अपेक्षा आणि इच्छा ही आपल्या प्रत्येकातच विद्यमान असते. कारण आनंद हा मानवाचा मुलभूत स्वभाव आहे.

अरविंद देशमुख : निवृत्त अभियंता मित्र मंडळाची व्याख्यानमालायवतमाळ : आनंद प्राप्तीची अपेक्षा आणि इच्छा ही आपल्या प्रत्येकातच विद्यमान असते. कारण आनंद हा मानवाचा मुलभूत स्वभाव आहे. मानवाचे जीवन जगणे हे आनंदाच्या शोधासाठी केलेला प्रवास आहे, असे उद्गार प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांनी काढले. निवृत्त अभियंता मित्र मंडळाद्वारे आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत ‘कशासाठी...? आनंदासाठी!’ या विषयावर ते बोलत होते. निवृत्त अभियंता मित्र मंडळाचे अध्यक्ष गोपाळ भास्करवार अध्यक्षस्थानी होते. व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सुभाष काळे, किशोर कावलकर, संयोजक प्रमोद देशपांडे आदी उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय किशोर इंगळे यांनी करून दिला. वसुधा पांडे यांनी स्वागतगीत सादर केले. किशोर कावलकर यांनी आभार मानले. संचालन निवृत्त अभियंता मित्र मंडळाचे सचिव वसंत पांडे यांनी केले.डॉ. अरविंद देशपांडे पुढे म्हणाले, सुखासाठी मानव सतत प्रयत्न करतो. परंतु प्रत्येकवेळी सुख मिळेलच याची शाश्वती नसते. सुख किंवा दु:ख याचा अधिक विचार न करता मानवाने आपली सहनशीलता वाढविली पाहिजे. एकदा सहनशीलतेमध्ये वाढ झाली की, आनंदाची मात्रा वाढू शकते. आनंद ही आंतरिक अवस्था असून बाह्य गोष्टीमुळे ही आंतरिक अवस्था भंग पावावयास नको, असे डॉ. देशमुख म्हणाले. बाहेरची परिस्थिती बिघडली तरी आंतरिक अवस्था मात्र कुठेही बिघडवू न देणारी अनेक थोर मंडळी भारतात होवून गेली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, विदर्भातील थोर संत गाडगेबाबा, सोपानदेव चौधरी, मोरारजी देसाई, प्राचार्य राम शेवाळकर ही काही उदाहरणे देता येतील. प्रतिकूल परिस्थितीतही आनंदाचा पोत सांभाळावा. जीवन जगताना आनंद घ्यावा आणि आनंद द्यावा. त्यासाठी आपल्या मनातील सुप्त महत्त्वाकांक्षा, अपेक्षा किंवा अनिष्ठ स्पर्धा आड येणार नाही याची काळजी घ्यावी, असे डॉ. देशमुख म्हणाले. मंडळाचे सहसचिव उत्तम राठोड यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. (वार्ताहर)