शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा पोलिसांची लक्तरे वेशीवर

By admin | Updated: June 2, 2017 01:49 IST

पाटणबोरी येथील जुगार अड्ड्यावर यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने बुधवारी धाड यशस्वी केल्याने पांढरकवडा पोलिसांच्या ...

पाटणबोरीत एलसीबीची धाड : मटका, जुगार, जनावरांची वाहतूक, गुटख्याचे आव्हान लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पाटणबोरी येथील जुगार अड्ड्यावर यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने बुधवारी धाड यशस्वी केल्याने पांढरकवडा पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. पाटणबोरी, पिंपळखुटी परिसरातील जुगार मटका अड्ड्यांचे आव्हान पोलिसांपुढे आहे. महामार्ग आणि राज्य सीमेवर असलेल्या पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, कोंबडबाजार, प्रतिबंधित गुटखा तस्करी, जनावरांची चोरटी वाहतूक, गांजा तस्करी चालते. ही तस्करी रोखण्याचे आव्हान ठाणेदार असलम खान यांच्यापुढे आहे. पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका, जुगार चालतो. अनेकदा तेथे धाडी पडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी तर पांढरकवडाच नव्हेतर एलसीबीची निष्क्रियता पाहून अमरावतीचे तत्कालिन विशेष पोलीस महानिरीक्षक विष्णुदेव मिश्रा यांच्या पथकाला पिंपळखुटीतील जुगारावर धाड घालावी लागली होती. हा परिसर कोंबडबाजारासाठीही सर्वश्रुत आहे. क्रिकेटच्या सट्ट्याचेही पांढरकवड्यात नेटवर्क आहे. हे अवैध धंद्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे आव्हान नवे ठाणेदार असलम खान यांच्यापुढे राहणार आहे. सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ते कशा पद्धतीने हाताळतात, यावरही बरेचकाही अवलंबून आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड व नागपुरातून लगतच्या राज्यात कत्तलीसाठी जनावरे पाठविली जातात. त्याची वाहतूक रोखण्यात पांढरकवडा पोलीस कितपत यशस्वी होतात, याकडे लक्ष लागले आहे.अलिकडेच बदली झालेले ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या काळातही अवैध धंद्यांचा धुमाकूळ सुरू होता. नवे ठाणेदार त्यांचाच कित्ता गिरवितात की, वेगळी वाट निवडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. असलम खान यांच्या नियुक्तीचे रहस्य कायमअसलम खान यांना पांढरकवडा ठाणेदार बनविण्यात आल्याने सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत. कारण खान यांच्या विरोधात जनावर तस्करीला पाठबळ देतात म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी अनेक तक्रारी प्रशासनासह आपल्या पक्षाच्या नेत्यांकडे केल्या होत्या. असे असताना त्यांना नियंत्रण कक्षात बसविण्याऐवजी भाजपाच्या ‘मतदारसंघात’ पांढरकवड्याला नियुक्ती मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.