शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’ने मोडले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

दिग्रस शिवारात ऊस पीक घेण्यायोग्य जमिन असल्याने शेतकरी सुमारे १०० ते १५० एकरमध्ये काळ्या ऊसाची लागवड करतात. ऊसाची लागवड साधारणत: ऑक्टोबर महिन्यात करण्यात येत असून मार्च महिन्यापर्यंत त्याचे उत्पादन होते. लागवडीनंतर यावर्षी मार्च महिन्यात जेव्हा ऊस विक्री योग्य झाला त्यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित झाल्याने ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना मजुरच मिळाले नाही.

ठळक मुद्देरसवंती बंदचा फटका : पुढीलवर्षी पेरा घटण्याची शक्यता; यंदा लागवड खर्चही निघाला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी(रेल्वे) : नजीकच्या दिग्रस शिवारात शेतकरी काळ्या ऊसाची लागवड करून त्याचे उत्पन्न घेतात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या संकटाने लॉकडाऊन असल्याने ऊस कापणीकरिता मजूर मिळत नसल्याने तसेच संचारबंदीमुळे बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शेतकरी हतबल अवस्थेत दिसत आहे.दिग्रस शिवारात ऊस पीक घेण्यायोग्य जमिन असल्याने शेतकरी सुमारे १०० ते १५० एकरमध्ये काळ्या ऊसाची लागवड करतात. ऊसाची लागवड साधारणत: ऑक्टोबर महिन्यात करण्यात येत असून मार्च महिन्यापर्यंत त्याचे उत्पादन होते. लागवडीनंतर यावर्षी मार्च महिन्यात जेव्हा ऊस विक्री योग्य झाला त्यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित झाल्याने ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना मजुरच मिळाले नाही. ऊस तोडणीसाठी बाहेर जिल्ह्यातून मजूर बोलविण्यात येत होते. पण, त्यांना देखील आणता आले नाही. शेतकरी ऊस नागपूर ,चंद्रपूर, वर्धा येथील बाजारपेठेत विक्रीकरिता नेत होते. तसेच रसवंतीसाठीही मोठ्याप्रमाणात ऊसाची मागणी असायची. पण, यावर्षी रसवंती सुरू न जाल्याने नाईलाजास्तव ऊस जनावरांना चारावा लागण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यावर्षी दिग्रस शिवारात १०० एकरवर ऊसाची लागवड झाली. त्यापैकी ५० एकरातील ऊस डिसेंबर, जानेवारी महिन्यापर्यंत विकल्या गेला व उर्वरित ५० एकरातील ऊस हा या विक्री करिता व पुन्हा लागवडीसाठी ठेवला होता. पण, लॉकडाऊनमुळे ऊस विक्री होवू न शकल्याने ऊस शेतातच वाळला. त्यामुळे उत्पन्न हाती येणार नाही.नुकसान भरपाईची मागणीऊसाला उठाव नसल्याने तसेच लॉकडाऊन असल्याने शेतकरी हताश झाले असून नियमित ऊस पीक घेणारे शेतकरी अन्य पिकाकडे वळल्याचे दिसून येत आहे. ऊसाच्या नुकसानीबाबत शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकºयांकडून होत आहे.५० एकर शेतातील पीक वाळलेलॉकडाऊनुमळे बाजारपेठा बंद असल्याने ऊसाला मागणी नसल्याने दिग्रस शिवारातील भुपेश देवतळे, नाना घोडे, आशिष देवतळे, मनोज गवते, मनोहर साठोणे, नामदेव घोडे, राजू देवतळे, दत्तू नखाते, सागर देवतळे, बंडू खडसे आदींसह अनेक शेतकºयांचा ५० एकरातील ऊस शेतातच वाळला असून नाईलाजास्तव त्यांना ऊस जनावरांना चारावा लागत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याagricultureशेती