शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दारू विकणाऱ्या दुकानांची झडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

१८ मार्च रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व दारू दुकानांची तपासणी करून तेथील स्टॉक किती याच्या नोंदी घेतल्या होत्या. दुकानांना सीलही लावले होते. मात्र बंदच्या काळात अधिकचा फायदा उचलण्यासाठी मागच्या दाराचा आधार घेऊन चोरट्या मार्गाने दारू विक्री सुरू आहे. कळंब येथील दारू दुकानाला पोलीस खात्यातूनच काहींचे अभय मिळाल्याने विक्री जोरात सुरू झाली.

ठळक मुद्देस्टॉकमध्ये तफावत । कळंब व छोटी गुजरीतील दुकानांना ‘खाकी’चे अभय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊन असल्याने सर्व दारू दुकाने बंद आहेत. या बंदच्या काळात जादा दराचा फायदा घेऊन दारू विक्री सुरू होती. कळंब येथील दारू दुकानाला थेट यवतमाळातून वर्दीचे अभय मिळत होते. या दुकानदाराने दोन पेट्या पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांना भेटही दिल्या. त्यामुळे त्याची हिंमत वाढली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अचानक धाड टाकून तेथील स्टॉक तपासला. यात मोठी तफावत आढळून आली.१८ मार्च रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व दारू दुकानांची तपासणी करून तेथील स्टॉक किती याच्या नोंदी घेतल्या होत्या. दुकानांना सीलही लावले होते. मात्र बंदच्या काळात अधिकचा फायदा उचलण्यासाठी मागच्या दाराचा आधार घेऊन चोरट्या मार्गाने दारू विक्री सुरू आहे. कळंब येथील दारू दुकानाला पोलीस खात्यातूनच काहींचे अभय मिळाल्याने विक्री जोरात सुरू झाली. या मोबदल्यात संबंधित अधिकाऱ्यांना ब्रॅन्डेड पेट्या भेट देण्यात आल्या. यवतमाळ शहरात याचे काही लाभार्थी आहे. यामुळेच आपले काही बिघडणार नाही अशा अविर्भावात विक्री सुरू होती.यवतमाळ शहरातील छोटी गुजरी येथील एका दारू दुकानातून मागच्या दाराने विक्री सुरू होती. राजरोसपणे हा प्रकार सुरू असल्याने अखेर राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने गुरुवारी धाड टाकली. तेथील स्टॉक तपासला असता. मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली. आता त्याचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.बंदच्या काळात दारु विक्री करणाऱ्या तीन बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. या दारू दुकान चालकांवरही कठोर कारवाई अपेक्षित आहे.कळंबमधून दारू आणण्यासाठी चक्क ‘स्कॉटिंग’ !कळंब येथील दारू दुकानातून ९ एप्रिलच्या रात्री २ वाजता थेट खात्याचे वाहन पोहोचले. दारूच्या वाहनाला स्कॉटिंग करीत यवतमाळ शहरात आणण्यात आले. येथे आल्यानंतर बक्षिसी म्हणून त्या अधिकाऱ्यांना त्यांच्या वाट्याच्या पेट्या पोहोचविण्यात आल्या. या कामात रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :liquor banदारूबंदी