शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांनी दिलेल्या पर्यायांचा विचार करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST

चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यवतमाळ व स्थानिक प्रशासन यांच्यात मंगळवारी बैठक झाली. सुरुवातीला चेंबर ऑफ कॉमर्सने यवतमाळात कोरोना नियंत्रणात आणल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन केले. दरम्यान, लॉकडाऊन-४ मध्ये सर्व दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, असे निवेदन सादर केले. या निवेदनावर चर्चा करण्यात आली. बाजारपेठ बंद असल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांना त्रास होत असल्याची बाजू प्रामुख्याने मांडण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही : चेंबर आॅफ कॉमर्सची बैठक, दंड आकारल्यास मला सांगा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण दुकाने उघडण्याची आजची परिस्थिती नाही. मात्र चेंबर ऑफ कॉमर्सने सुचविलेल्या पर्यायांचा निश्चित विचार केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिले. शुक्रवार, २२ मेपासून नवीन आदेश जारी केला जाणार आहे. तूर्तास १७ मे रोजीच्याच आदेशानुसार व्यवहार चालतील, असे त्यांनी सांगितले.चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यवतमाळ व स्थानिक प्रशासन यांच्यात मंगळवारी बैठक झाली. सुरुवातीला चेंबर ऑफ कॉमर्सने यवतमाळात कोरोना नियंत्रणात आणल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन केले. दरम्यान, लॉकडाऊन-४ मध्ये सर्व दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, असे निवेदन सादर केले. या निवेदनावर चर्चा करण्यात आली. बाजारपेठ बंद असल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांना त्रास होत असल्याची बाजू प्रामुख्याने मांडण्यात आली. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सने काही पर्याय सुचविले. बऱ्याच दिवसांपासून बाजार बंद असल्याने दुकाने उघडताच गर्दी होईल. कधी तरी ते होणारच आहे. दुकाने नियमित सुरू झाल्यास गर्दी ओसरेल, असे मत व्यापाऱ्यांनी यावेळी मांडले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेशात चेंबर आॅफ कॉमर्सच्या सूचनांचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले.जिल्ह्यातील सर्व व्यापारी संघटनांनी चेंबर ऑफ कॉमर्समार्फत किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात दुकाने उघडण्याविषयी लेखी सूचना कराव्या, जेणेकरून त्यावर निर्णय घेता येईल, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महेंद्रिकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू, उपाध्यक्ष राजेंद्र निमोदिया, सचिव गणेश गुप्ता, महेश करवा, मनिष मोर, संजय सूचक, सारंग भालेराव आदी उपस्थित होते.एक-दोन क्रमांक पर्यायपूर्ण दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, एक व दोन क्रमांक मार्किंग करून एक दिवस एक क्रमांकाची व दुसऱ्या दिवशी दोन क्रमांकाची दुकाने सुरू ठेवावी.‘सम-विषम’वर भरपहिल्या दिवशी उजव्या बाजूची, तर दुसऱ्या दिवशी डाव्या बाजूची दुकाने उघडू द्यावी. दर पाच दुकानांपैकी एक दुकान सुरू ठेवावे, असे पर्याय देण्यात आले.दोन महिने दुकाने बंद असल्याने व्यापारी त्रस्तव्यापाऱ्यांनी उन्हाळा व लग्नसराईचा सिझन ओळखून दुकानांमध्ये मोठा माल भरला होता. मात्र लॉकडाऊनमुळे हा सिझन आलाच नाही. आता दुकानातील व गोडावूनमधील माल तसाच पडून आहे. त्याची चिंता व्यापाऱ्यांना सातत्याने त्रस्त करीत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी