स्मृती पर्वात विचारवंतांचे व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 06:00 IST2019-12-07T06:00:00+5:302019-12-07T06:00:07+5:30

स्मृती पर्वात ‘विमुक्त भटके आणि शासकीय आयोग’ या विषयावर ते बोलत होते. भटक्या विमुक्त जमाती यांच्या संयोजनात हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉ. टी.सी. राठोड होते. मंचावर डॉ. विजय कडेल, राजुदास जाधव, अनिल आडे, नवलकिशोर राठोड, पी.पी. पवार, नारायण शिंदे आदी उपस्थित होते.

Lecturers' Lectures in Memory Pass | स्मृती पर्वात विचारवंतांचे व्याख्यान

स्मृती पर्वात विचारवंतांचे व्याख्यान

ठळक मुद्देभटक्या विमुक्तांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक - नामा बंजारा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : देशभरात विखुरलेल्या विमुक्त-भटक्या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. त्यांचे मागासलेपण दूर करून त्यांना शैक्षणिक तथा नोकरीविषयक सवलती देऊन घटनेतील तिसऱ्या सूचीचे निर्माण झाले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे संस्थापक अध्यक्ष नामा बंजारा यांनी केले.
स्मृती पर्वात ‘विमुक्त भटके आणि शासकीय आयोग’ या विषयावर ते बोलत होते. भटक्या विमुक्त जमाती यांच्या संयोजनात हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉ. टी.सी. राठोड होते. मंचावर डॉ. विजय कडेल, राजुदास जाधव, अनिल आडे, नवलकिशोर राठोड, पी.पी. पवार, नारायण शिंदे आदी उपस्थित होते.
वेगवेगळ्या राज्यात भटक्यांना वेगवेगळ्या अनुसूचिमध्ये समाविष्ट केले आहे. यापूर्वी भटक्या विमुक्तांसाठी अनेक आयोगाची स्थापना करण्यात आली. विद्यमान भि.कू. इथापे आयोग स्थापून सरकारी पातळीवर ज्या शिफारशी केल्या जात आहे त्याची पुढे अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे नामा बंजारा यांनी सांगितले. प्रास्ताविक दिनेश राठोड, संचालन सुनील राठोड यांनी, आभार साहेबराव चव्हाण यांनी मानले.

Web Title: Lecturers' Lectures in Memory Pass