शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
3
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
4
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, आतापर्यंत चौघांचा मृत्यू
5
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
6
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
7
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
8
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
9
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
10
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
11
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
12
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
13
Spiritual Rebirth: एकटे राहावेसे वाटणे, भावनांचा उद्रेक होणे ही असू शकतात आध्यात्मिक पुनर्जन्माची लक्षणं!
14
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
15
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
16
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
17
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
18
Video - "डीएम अंकल, प्लीज रस्ता बनवून द्या..."; चिमुकलीची साद, अधिकारी आले थेट घरी
19
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
20
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
Daily Top 2Weekly Top 5

टेक्स्टाईल झोनसाठी ९० हेक्टरमध्ये ले-आऊट मंजूर

By admin | Updated: December 21, 2016 23:48 IST

मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या टेक्सटाईल झोनसाठी यवतमाळच्या भोयर एमआयडीसीतील ९० हेक्टर (२२५ एकर) क्षेत्रात ले-आऊट मंजूर करण्यात आले आहे.

एमआयडीसी : १७ भूखंड, जलनिस्सारण प्रकल्पाबाबत संभ्रम
यवतमाळ : मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या टेक्सटाईल झोनसाठी यवतमाळच्या भोयर एमआयडीसीतील ९० हेक्टर (२२५ एकर) क्षेत्रात ले-आऊट मंजूर करण्यात आले आहे. तेथे आता उद्योगांची प्रतीक्षा राहणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी यवतमाळात टेक्सटाईल झोनची घोषणा केली होती. गेली अनेक महिने या झोनसाठीचे कामकाज थंडबस्त्यात असले तरी आता त्याला गती आल्याचे सांगितले जाते. यवतमाळातील लोहारा एमआयडीसीचा विस्तार हा भोयरपर्यंत झाला आहे. तेथे नव्याने एमआयडीसीने भूसंपादन केले आहे. टेक्सटाईल झोनसाठी ९० हेक्टर क्षेत्र आरक्षित करण्यात आले आहे. विशेष असे या ९० हेक्टरमध्ये ले-आऊटही मंजूर झाले आहे. तेथे मोठे उद्योग डोळ्यापुढे ठेऊन १७ भूखंड तयार करण्यात आल्याची माहिती एमआयडीसीच्या सूत्रांनी दिली. टेक्सटाईल झोनच्या दृष्टीने एमआयडीसीने प्राथमिक तयारी केली असल्याने आता तेथे उद्योगांची प्रतीक्षा राहणार आहे.
एमआयडीसीने ले-आऊट मंजूर केले असले तरी टेक्सटाईल झोनसाठी ही जागा तर कमी पडणार नाही ना याबाबत यंत्रणेत साशंकता पहायला मिळते. कारण ९० हेक्टरपैकी बरीच जागा ही खुले भूखंड आणि रस्त्यांमध्ये जाणार आहे. शिवाय जलनिस्सारन व शुद्धीकरण केंद्राबाबतही संभ्रम आहे. या केंद्राला किमान सात ते आठ हेक्टर जागा लागणार आहे. यवतमाळच्या टेक्सटाईल झोनमध्ये नेमके उद्योग कशा स्वरूपाचे येतात यावर या केंद्राची आवश्यकता अवलंबून राहणार आहे. येथे जिनिंग प्रेसिंग, कापड तयार करणे यासारखे उद्योग आल्यास या केंद्राची आवश्यकता नाही. परंतु कापडाला रंग देणारा उद्योग येत असेल तरच जल:निस्सारन व शुद्धीकरण केंद्राची आवश्यकता भासणार आहे. कारण या रंग कारखान्यातून निघणारे रसायन मिश्रीत पाणी आधी शुद्ध करून नंतर त्याचा निचरा केला जाणार आहे. किमान झाडांना देण्यायोग्य हे पाणी बनविले जाणार आहे. त्यासाठीच या केंद्राची आवश्यकता राहणार असून त्याचे बजेट अडीच ते तीन कोटी रुपयांचे राहणार आहे. रंग कारखाना न आल्यास हे केंद्र लागणार नाही, पर्यायाने टेक्सटाईल झोनसाठी सात ते ंआठ हेक्टर जागा आणखी उपलब्ध होईल.
यवतमाळ प्रमाणेच अमरावतीलासुद्धा टेक्सटाईल झोनचे ्रकाम सुरू झाले आहेत. यवतमाळात दळणवळण सोईचे नसल्याने उद्योजकांची पसंती राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असलेल्या नांदगावपेठ (अमरावती) येथील पंचतारांकित एमआयडीसीला राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

उद्योगांसाठी हवेत आता राजकीय प्रयत्न
यवतमाळच्या टेक्सटाईल झोनमध्ये किमान जिनिंग प्रेसिंग, कापड तयार करणारे उद्योग तरी यावे या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. एमआयडीसीने झोन तयार केला असला तरी तेथे उद्योग खेचून आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची ठरणार आहे. कारण आमदारांच्या एका समितीने मूळ यवतमाळात कापूस पिकतोच कुठे असा प्रश्न उपस्थित करून हा टेक्सटाईल झोन कळंब, पांढरकवडा या भागात हलविण्याची सूचना आधीच केली आहे. हा झोन यवतमाळातच थांबविणे आणि तेथे उद्योग खेचून आणण्याचे आव्हान सत्ताधारी भाजपा-शिवसेनेच्या मंत्री, खासदार-आमदारांपुढे राहणार आहे.