शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पुसद उपविभागातील सहकाराला अखेरची घरघर

By admin | Updated: August 20, 2014 23:47 IST

उपविभागातील सहकार क्षेत्राला पुढाऱ्यांच्या उदासीनतेने अखेरची घरघर लागल्याचे दिसत आहे. सहकारातील कारखाने, सोसायट्या डबघाईस आल्या आहे. शोकडो हातांना काम देणारे कारखाने

पुसद : उपविभागातील सहकार क्षेत्राला पुढाऱ्यांच्या उदासीनतेने अखेरची घरघर लागल्याचे दिसत आहे. सहकारातील कारखाने, सोसायट्या डबघाईस आल्या आहे. शोकडो हातांना काम देणारे कारखाने बंद झाल्याने उपविभागातील शेकडो कुटुंब रोजगाराच्या शोधात स्थलांतरित होत आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही गाव सोडून दुसरीकडे धाव घ्यावी लागत आहे. पुसद उपविभाग राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात सुपरिचित आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या देदीप्यमान ११ वर्षांच्या कारकिर्दीने तर पुसदला देशाच्या नकाशावर नेऊन पोहोचविले. पुसद उपविभाग आदिवासी वाड्या व बंजारा तांड्यांनी बहरलेला आहे. माजी मुख्यमंत्रीद्वय वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या द्रष्टेपणातून वसंत सहकारी साखर कारखाना, पोफाळी, सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना, गुंज तसेच पुसद येथे जिल्हा सहकारी सूत गिरणी आदींची उभारणी करण्यात आली होती. मात्र या सहकार क्षेत्राला अखेरची घरघर लागली आहे. अपवाद पोफाळीचा वसंत साखर कारखाना आहे. पुसदची सूत गिरणी अनेक वर्षांपासून पूर्णत: बंद असून येथील तब्बल १ हजार २०० कामगारांचे संसार उघड्यावर पडले आहेत, हे विशेष.तसेच माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी राज्यातील प्रत्येक तालुक्याला उद्योगधंद्यांची निर्मिती व्हावी, या हेतूने सन १९९२ मध्ये एमआयडीसी निर्माण करण्याचा निर्णय घेतला. परंतु पुसदला लाल दिवा सातत्याने असूनही पुसदची एमआयडीसी अद्यापही विकसित झाली नाही, हे वास्तव आहे. त्यामुळेच नाईलाजाने गरीब कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी कामासाठी परजिल्हा व परप्रांतातही जावे लागत आहे.मजुरांच्या मोठ्या प्रमाणात स्थलांतराने त्यांच्या चिमुकल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनातर्फे मजुरांच्या मुलामुलींकरिता चालविण्यात येणारी हंगामी वसतिगृहेदेखील आता शासनाने बंद केली असून मजूरवर्ग आपल्या पाल्यांना सोबत घेवूनच कामाला जात असल्याचे चित्र सर्वदूर आहे. राजकारणी लोक आपल्याच विश्वात मश्गूल असल्याने आम्हाला नाईलाजाने घर सोडावे लागत असल्याची खंत दुसऱ्या मजुराने व्यक्त केली. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर पुसदची एमआयडीसी व सहकार क्षेत्राला नवीन उजाळा दिल्या जाऊ शकतो. तसेच शेतीला पूरक जोडधंद्यांसाठीही लोकांना प्रोत्साहीत करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांच्या तोंडून या निमित्ताने बाहेर पडत आहेत. त्या ऐकून तरी लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करून पुढाकार घेण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)