शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये प्राथमिक सुविधांचा अभाव

By admin | Updated: July 28, 2014 23:46 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना असुविधेचा सामना करावा लागतो. नजीकच्या काही वर्षातील पटसंख्या पाहता, या शाळांवरून पालकांचा विश्वास उडत असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांची गळती

कळंब : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना असुविधेचा सामना करावा लागतो. नजीकच्या काही वर्षातील पटसंख्या पाहता, या शाळांवरून पालकांचा विश्वास उडत असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांची गळती हा विषय सर्वांसाठी चिंतेचा ठरत आहे.ग्रामीण भागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची रोडावणारी संख्या ही तफावत अधोरेखित करणारी आहे. बहुतांश शाळांमध्ये शौचालय, विद्युत पुरवठा, अपंगांसाठी रॅम्प, खेळांचे मैदान आदी बाबींचा अभाव आहे. शाळेला पुरविलेले संगणक शोभेची वस्तू ठरू लागले आहे. याला काही शाळा अपवाद असतीलही. पण शाळा तपासणीसाठी कोणी आला तरच संगणकावरील धूळ झटकली जाते, ही वास्तविकता आहे. काही शाळांना संगणकाची प्रतीक्षा आहे. कळंब तालुक्यात तर बहुतांश शाळांमध्ये किचनशेड नाही. मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही. पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही. पुस्तके वेळेवर दिली जात नाही. गणवेश वाटपातही विलंब केला जातो. यावरून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पायाभूत सुविधांची अवस्था बिकट असल्याचे दिसून येते. याउलट खासगी शाळांमध्ये भरमसाठ फी असतानाही विद्यार्थ्यांनी संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक पालकांचा विश्वास गमावत असल्याचे दिसून येते. विद्यार्थी संख्या रोडावण्याऱ्या मुलभूत कारणांची कारणमिमांसा करण्यात शिक्षण विभाग कमी पडत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षकवर्ग केवळ पगारासाठी येतात, विद्यार्थ्यांप्रती त्यांची खास बांधिलकी नसते, असा आरोपही पालकातून केला जातो. ही स्थिती कायम राहिल्यास येणाऱ्या काळात शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)