पर्यावरण संवर्धनासाठी ‘जेडीआयईटी’चा पुढाकार

By Admin | Updated: August 24, 2015 00:08 IST2015-08-24T00:08:25+5:302015-08-24T00:08:25+5:30

बेसूमार होत चाललेली वृक्षतोड, धुरांमुळे होणारे प्रदूषण यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.

'Jedi' initiative for environmental conservation | पर्यावरण संवर्धनासाठी ‘जेडीआयईटी’चा पुढाकार

पर्यावरण संवर्धनासाठी ‘जेडीआयईटी’चा पुढाकार

यवतमाळ : बेसूमार होत चाललेली वृक्षतोड, धुरांमुळे होणारे प्रदूषण यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. या बाबी नियंत्रणात आणण्यासाठी वृक्ष संवर्धन महत्त्वाची बाब आहे. यासाठी येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रासेयो पथकाने पुढाकार घेतला आहे. महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, ‘इटा’ क्लबचे प्रमुख प्रा. पंकज पंडित, प्रा. संदीप सोनी, प्रा. सचिन असवार, रविन सिंग, हरिश टांक आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणाचे आणि संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रगती पवार, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. पद्मिनी कौशिक, प्रा. आशीष माहुरे, प्रा. सुजित गुल्हाने, प्रा. शेंडे, प्रा. पायल पावडे, प्रा. नितीन चव्हाण, प्रा. जिरापुरे, प्रा. विद्याशेखर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.
या उपक्रमाचे संस्थाध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर आदींनी कौतुक केले. (वार्ताहर)

Web Title: 'Jedi' initiative for environmental conservation