शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 05:00 IST

प्रा. सुभाष वाठोरे असे या प्राध्यापकाचे नाव असून ते ठाणे येथे ज्ञानसाधना महाविद्यालयात २५ वर्षांपासून प्राध्यापकाची नोकरी करीत आहे. ब्राम्हणगाव येथे त्यांची वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. नोकरीमुळे इच्छा असूनही ते शेतीकडे वळू शकले नव्हते. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे त्यांना गावाकडे परत यावे लागले. या सुटीच्या कालावधीत त्यांनी शेतीवर लक्ष केंद्रीत करून हळदीचे पीक घेतले. सध्याही आॅनलाईन अध्यापनाच्या कामामुळे त्यांना शेतीवरही लक्ष देता येणे शक्य होत आहे.

ठळक मुद्देप्राध्यापकाने चार एकरात फुलविले हळदीचे पीक : लॉकडाऊन काळात गावी परतले, संधीचे केले सोने

 अविनाश खंदारेलोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : लॉकडाऊनमध्ये अनेक शहरी कर्मचाऱ्यांना मूळ खेड्यात परतावे लागले. मात्र याच सक्तीच्या सुटीचा उपयोग करीत एका प्राध्यापकाने चार एकरात हळदीचे पिक फुलवून संधीचे सोने केले.प्रा. सुभाष वाठोरे असे या प्राध्यापकाचे नाव असून ते ठाणे येथे ज्ञानसाधना महाविद्यालयात २५ वर्षांपासून प्राध्यापकाची नोकरी करीत आहे. ब्राम्हणगाव येथे त्यांची वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. नोकरीमुळे इच्छा असूनही ते शेतीकडे वळू शकले नव्हते. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे त्यांना गावाकडे परत यावे लागले. या सुटीच्या कालावधीत त्यांनी शेतीवर लक्ष केंद्रीत करून हळदीचे पीक घेतले. सध्याही आॅनलाईन अध्यापनाच्या कामामुळे त्यांना शेतीवरही लक्ष देता येणे शक्य होत आहे. आज त्यांच्या हळद पिकाला शंभर दिवस पूर्ण झाले आहे. हे पीक साडेपाच ते सहा फूट उंचीचे बहरले असून येणाऱ्या जाणाऱ्यांना आकर्षित करीत आहे. काढणीला येण्यासाठी १४० दिवस असा मोठा कालावधी शिल्लक राहिलेला असताना त्यांचे पीक आजच सुदृढ अवस्थेत वाढले आहे. त्यामुळे प्राध्यापकाच्या कास्तकारीचे कौतुक होत आहे. चार महिन्यात शेतीशी समरस होऊन प्रा. वाठोरे यांनी आपले पीक तळहातावरील फोडाप्रमाणे जपले.यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी येथे मेहनती शेतकºयांची कमतरता नाही, असे मत प्रा. सुभाष वाठोरे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती