शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

हॅकर्सची आंतरराज्यीय टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST

विवेकानंद सोसायटीत राहणारे शिक्षक सूर्या अजय शुक्ला यांचे बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने परस्पर दोन लाख ५७ हजार ३०६ रुपयांची खरेदी केल्याचा प्रकार उघड झाला. शुक्ला यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी १७ डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली. त्यांच्याकडे अ‍ॅक्सीस बँकेचे क्रेडीट कार्ड होते. मात्र या कार्डाची कुठलीही डिटेल त्यांनी शेअर केले नाही. त्यानंतरही या हॅकर्सने थेट बँकेच्या फायरवॉलवरून माहिती गोळा करत परस्पर रक्कम उडविली.

ठळक मुद्देअवधूतवाडी पोलिसांची कारवाई : बँकेची फायरवॉलच करतात हॅक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बँक डिटेल्सची कुठलीही माहिती न मिळविता ऑनलाईन ट्रान्झेक्शनद्वारे खात्यातून पैसे उडविणारी हॅकर्सची टोळी अवधूतवाडी पोलिसांनी जेरबंद केली. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होताच दहा दिवसात आरोपींना शोधून अटक केली. ही कामगिरी सायबर एक्सपर्ट सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्रसिंग बिलावल यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण केली.विवेकानंद सोसायटीत राहणारे शिक्षक सूर्या अजय शुक्ला यांचे बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने परस्पर दोन लाख ५७ हजार ३०६ रुपयांची खरेदी केल्याचा प्रकार उघड झाला. शुक्ला यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी १७ डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली. त्यांच्याकडे अ‍ॅक्सीस बँकेचे क्रेडीट कार्ड होते. मात्र या कार्डाची कुठलीही डिटेल त्यांनी शेअर केले नाही. त्यानंतरही या हॅकर्सने थेट बँकेच्या फायरवॉलवरून माहिती गोळा करत परस्पर रक्कम उडविली. हा गुन्हा सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्रसिंग बिलावल यांच्याकडे तपासासाठी सोपविण्यात आला. ठाणेदार आनंद वागदकर यांनी त्यांच्या मदतीसाठी प्रदीप कुऱ्हाडकर, सुधीर पुसदकर या दोन शिपायांची नेमणूक केली. या पथकाने दहा दिवसातच हा गुन्हा उघड केला. त्यात सागर प्रदीप शेट्टी (२१) रा.३७, लक्ष्मीनगर, गल्लामंडी, बर्खिडी, जहागिराबाद, भोपाल (मध्यप्रदेश) याच्यासह दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. या टोळीने बँकेचे फायरवॉल हॅक करून परस्पर फ्लिपकार्टद्वारे वस्तूंची आॅनलाईन खरेदी केली. यात एक अ‍ॅप्पल कंपनीचा मॅक बूक लॅपटॉप, अ‍ॅप्पल कंपनीचा मोबाईल, अ‍ॅप्पल कंपनीचा एअरपॉड्स, सॅमसंगचा ब्ल्यू टूथ की, सॅमसंग नोट मोबाईल, अर्मानी कंपनीचे घड्याळ असा दोन लाख ५७ हजार ३०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपींकडून स्पाईस मोबाईल, सॅमसंग नोट मोबाईल, सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा दोन लाख ९३ हजार ३०६ रुपयांचा मुद्देमाल परत मिळविला.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. या कामगिरीत सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी, जमादार नासीर शेख, सायबर सेलमधील दिगांबर पिलावन यांनीही सहभाग घेतला.

टॅग्स :Policeपोलिस