शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर मोझॅकचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 27, 2014 23:22 IST

मुळावा, पोफाळी परिसरात सोयाबीन पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. गेल्या २० पेक्षा अधिक वर्षांपासून या परिसरात सोयाबीनची लागवड केली जाते.

शेतकरी धास्तावले : २० वर्षांत पहिल्यांदाच लागणमुळावा : मुळावा, पोफाळी परिसरात सोयाबीन पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. गेल्या २० पेक्षा अधिक वर्षांपासून या परिसरात सोयाबीनची लागवड केली जाते. कमीअधिक पावसात हमखास फायदा मिळवून देणारे पीक म्हणून सोयाबीनची निवड केली जाते. या पिकाने अनेकांचे जीवनमान उंचावल्यामुळे अनेक कापूस उत्पादक शेतकरी कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या सोयाबीनकडे वळले आहे. यावर्षी आधीच निसर्गाचा लहरीपणा आणि आता सोयाबीनवर मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे हातचे पीक जाण्याची भीती व्यक्त होत आहे. तरोडा येथील पंजाबराव चव्हाण यांचे पाच एकर सोयाबीन या रोगाच्या सावटात आले आहे. तसेच जयवंत चव्हाण, प्रशांत चव्हाण, डॉ. विठ्ठल चव्हाण, तिवरंग येथील गणेश कदम, राहुल चौतमाल, पार्डी येथील रूस्तम चव्हाण, नानाराव चव्हाण, राजेश खंडारे, किसन चव्हाण या सर्व दोन ते दहा एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर या आजाराची लागण झाल्याचे दिसून येत आहे. यावर कृषी विभागाच्या मार्गदर्शनात विविध प्रकारचे कीटकनाशके व बुरशीनाशक फवारणी केल्यानंतरही या आजाराच्या कीडींवर नियंत्रण मिळविणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. तरोडा येथे कृषी सहायक डी.एस. केकान यांनी भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा ७५ टक्के सोयाबीनचे क्षेत्र या परिसरातील या आजाराने बाधित झाल्याची माहिती त्यांनी दिली. २० ते २५ वर्षांत प्रथमच अशा प्रकारच्या रोगामुळे शेतकरी गोंधळून गेले आहे. जिल्हा कृषी विभागाने याची गांभीर्याने दखल घेवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)