शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गब्याने पोलीस शिपायाला घातली भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 05:00 IST

पोलीस मुख्यालयातील शिपाई विठ्ठल गणपत टेकाम ब. नं. २३७ हा सुरक्षा गार्ड म्हणून रुग्णालयात कर्तव्यावर होता. कुख्यात गब्या आजारी असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्याने बोलण्यातून साध्या, सरळ शिपायाला आपल्या जाळ्यात ओढले. मला मधुमेहासारखा आजार असून रुग्णालयातील जेवणाचा वास येतो, त्यामुळे माझी प्रकृती  सुधारत नाही, असे म्हणत त्याला आपल्या बोलण्यातून भुरळ घातली. शिपाई टेकाम यालाही गब्याची दया आली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वणी तालुक्यात गंभीर गुन्हे शिरावर असलेल्या मोहंमद नावेद ऊर्फ गब्या याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिशय चाणाक्ष व क्रूर आरोपी म्हणून गब्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. उपचार घेत असलेल्या गब्याने पोलीस शिपायाला आपल्या बोलण्यातून भुरळ घातली. आजारपणात दवाखान्यातील जेवण खावेसे वाटत नाही, माझ्यावर दया कर, मला चांगल्या ठिकाणी जेवायला घेऊन चल असे म्हणत तो रुग्णालयाबाहेर पडला. संधी मिळताच शिपायाची दुचाकी घेऊन पळून गेला. पोलीस मुख्यालयातील शिपाई विठ्ठल गणपत टेकाम ब. नं. २३७ हा सुरक्षा गार्ड म्हणून रुग्णालयात कर्तव्यावर होता. कुख्यात गब्या आजारी असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्याने बोलण्यातून साध्या, सरळ शिपायाला आपल्या जाळ्यात ओढले. मला मधुमेहासारखा आजार असून रुग्णालयातील जेवणाचा वास येतो, त्यामुळे माझी प्रकृती  सुधारत नाही, असे म्हणत त्याला आपल्या बोलण्यातून भुरळ घातली. शिपाई टेकाम यालाही गब्याची दया आली. तो गब्याला स्वत:च्या एमएच-२९-यू-११६७ या दुचाकीवर बसवून रुग्णालयाबाहेर पडला. महादेव मंदिराच्या परिसरात गब्याने दुचाकी थांबविण्यास सांगितली. संधीचा फायदा घेत त्याने विठ्ठल टेकाम यांना जोरदार धक्का दिला व त्यांचीच दुचाकी घेऊन त्याने पोबारा केला. शिपाई आरडाओरडा करीपर्यंत गब्या पसार झाला होता. भावनेच्या आहारी जाऊन पाेलीस शिपायाने कायद्याचा भंग केला. आता त्याच्यावर खात्यांतर्गत कारवाई होणार आहे. मोठी चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विठ्ठल  टेकाम यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गब्याविरुद्ध कलम २२४, ३७९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. 

 यापूर्वीही एका शिपायाचा घेतला गैरफायदा - यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेत असलेल्या एका शिपायाने आर्थिक गुन्ह्यातील कुख्यात गुन्हेगाराला अशाच पद्धतीने लॉकअपबाहेर काढून नववर्षाची पार्टी साजरी केली होती. त्यावेळी संपूर्ण पाेलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पथक हादरले होते. पहाटे त्या कुख्यात आरोपीला अटक करण्यात आली होती. त्या आरोपीनेही शिपायाच्या साध्याभोळेपणाचा फायदा घेऊन डाव साधला होता. त्याचीच पुनरावृत्ती गब्याने केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस