ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्राचे उद्घाटन

By Admin | Updated: November 28, 2015 03:23 IST2015-11-28T03:23:03+5:302015-11-28T03:23:03+5:30

शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्राचे बांधकाम करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले.

Inauguration of Senior Citizen Service Center | ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्राचे उद्घाटन

ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्राचे उद्घाटन

यवतमाळ : शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्राचे बांधकाम करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले.
जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक तक्रारी पुढे येत आहे. कामाच्या व्यापामुळे बऱ्याचदा या तक्रारी प्रलंबित राहतात, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना विनाकरण त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्र निर्माण करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या प्राधान्याने सोडविल्या जाव्या या उद्देशाने हे केंद्र निर्माण करण्यातही आले आहे. या केंद्राचे उद्घाटन २५ नोव्हेंबरला पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यासह पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Inauguration of Senior Citizen Service Center