केसुर्लीच्या जंगलात अवैध लाकूडतोड

By Admin | Updated: March 12, 2015 02:22 IST2015-03-12T02:22:26+5:302015-03-12T02:22:26+5:30

वणी-भालर-लाठी मार्गावरील केसुर्लीच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड तोड सुरू आहे. याकडे वन विभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

Illegal logging in Kasurli forest | केसुर्लीच्या जंगलात अवैध लाकूडतोड

केसुर्लीच्या जंगलात अवैध लाकूडतोड

वणी : वणी-भालर-लाठी मार्गावरील केसुर्लीच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड तोड सुरू आहे. याकडे वन विभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
परिसरातील गोकुलनगरमधील काही महिला, पुरूष गेल्या तीन महिन्यापासून या जंगलात लाकूडतोड करीत आहे. ही मंडळी सकाळी ६ वाजता आपल्या घरातील सदस्यांसोबत तीनचाकी सायकल रिक्षाने जंगलाकडे प्रस्थान करतात. केसुर्लीच्या पोहोचतात. या जंगलात मौल्यवान वनसंपदा आहे. ही वनसंपदा तोडून प्रथम दुचाकीने वणीला आणतात व त्यानंतर तिनचाकी रिक्षाने मैदानातील एका मीलमध्ये विक्री करीत असल्याचे सांगण्यात येते.
या मील संचालकाचे व वन विभागाचे साटेलोट असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे वन विभाग तेथील रेकॉर्डही तपासत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित मील मालकाचे चांगेलच फावत आहे. या जंगलाला लागूनच प्रसिद्ध निलगीरीचे वन आहे. तेथीलही वनसंपदा चोरट्यांनी नष्ट केली आहे. रात्री तर काही ब्रेड फॅक्टरी, हॉटेलमध्येही लाकडे विक्री केली जात असल्याची चर्चा आहे. या सर्व प्रकाराकडे वन विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
वणी परिसरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात असल्याने प्रदूषणाला रोखण्यासाठी वनसंपदेची आवश्यकता आहे. मात्र जंगलामध्ये दररोज वृक्षतोड होत असल्याने प्रदूषणामध्येही भर पडत आहे. याकडे वन विभागाने लक्ष देऊन लाकूडतोड करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Illegal logging in Kasurli forest