शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

कढईत उकळणारे तेल शिळे आढळल्यास लाखापर्यंत दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 05:00 IST

हाॅटेल्स, रस्त्यावरच्या टपऱ्या येथे पदार्थ तळण्यासाठी वापरले जाणारे तेल कधीच फेकून दिले जात नाही. सातत्याने त्याच तेलाचा वापर केला जातो. जुन्या तेलात नवीन तेल टाकून पदार्थ तळले जातात. यामुळे ट्रान्सफॅटी ॲसिड तयार होते. त्यातून दुर्धर आजार जडू शकतात. तेलाचा पुनर्वापर हा मानवी आरोग्यासाठी घातक ठरणारा आहे. त्यामुळेच एफडीएकडून निर्बंध घालण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कुठल्याही हाॅटेल किंवा चहा टपरीवर लोखंडी कढईत उकळणारे तेल व त्यात तळले जाणारे पदार्थ अनेकांना आकर्षित करतात. गरम समोसे, भजे, आलूबोंडा यांसारखे अनेक पदार्थ मोठ्या चवीने खाल्ले जातात. मात्र, यामुळे अनेक दुर्धर आजारांना आपण निमंत्रण देतो. हाॅटेलमधील तेलाच्या वापराबाबत आजपर्यंत कुठलीही कारवाई होत नव्हती. आता मात्र आरोग्याच्या समस्या वाढत असल्याने अन्न सुरक्षा विभागाने पदार्थ तळण्याच्या तेलाचे नॉर्म्स निश्चित केले आहेत. १५ ते २५ टीपीसीच्या आतीलच तेल पदार्थ तळण्यासाठी वापरता येणार आहे. त्यापेक्षा अधिक टीपीसी असलेले तेल वापरल्यास हाॅटेल व्यावसायिकांवर कारवाई केली जाणार आहे. अन्न सुरक्षा विभागाने तशी मोहीमही हाती घेतली आहे. यवतमाळ शहरासह तालुक्यांमध्येही लवकरच तपासणी करण्यात येणार आहे.

रस्त्यावर न खाल्लेले बरे- रस्त्यावर तळलेला पदार्थ अनेकजण चवीने खातो. मात्र, त्यातून गंभीर आजार होऊ शकतात. - काळ्याकुट्ट तेलामध्ये पदार्थ तळले जातात. गरम असेपर्यंतच त्याची चव लागते. - सतत रस्त्यावरचे पदार्थ खाल्ल्याने पोटाची पचनक्रिया बिघडते. अपचनाचा आजार जडतो.

 तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक

हाॅटेल्स, रस्त्यावरच्या टपऱ्या येथे पदार्थ तळण्यासाठी वापरले जाणारे तेल कधीच फेकून दिले जात नाही. सातत्याने त्याच तेलाचा वापर केला जातो. जुन्या तेलात नवीन तेल टाकून पदार्थ तळले जातात. यामुळे ट्रान्सफॅटी ॲसिड तयार होते. त्यातून दुर्धर आजार जडू शकतात. तेलाचा पुनर्वापर हा मानवी आरोग्यासाठी घातक ठरणारा आहे. त्यामुळेच एफडीएकडून निर्बंध घालण्यात आले आहे.

डॉक्टरांचा सल्ला

सतत बाहेरचे तेलकट पदार्थ खाल्ल्याने कोलेस्ट्राॅल वाढते, हृदयावर त्याचा परिणाम होतो. मैद्यापासून खाद्यपदार्थ तयार केले जातात. याचा पचनक्रियेवरही परिणाम होतो. त्यामुळे शक्यतोवर घरचेच जेवण घेणे चांगले राहील.- डाॅ. बाबा येलके, जनरल फिजिशियन

वारंवार एकाच तेलात तळल्याने त्यात ट्रान्सफॅटी ॲसिड तयार होते. त्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्यात ब्लाॅकेजेस तयार होतात. यामुळे हृदयरोगासारखा गंभीर आजार होऊ शकतो. हे टाळण्यासाठी तेलकट कमी खावे. - डाॅ. सतीश चिरडे, हृदयरोग तज्ज्ञ

...तर होईल गुन्हा दाखल

खाद्यतेलाच्या वापराबाबत नवे निर्देश आले आहेत. टोटल पोलर कंपाऊंड (टीपीसी) हा २५ पेक्षा अधिक असता कामा नये. अन्यथा संबंधितांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. एक लाखांपर्यंतचा दंड होऊ शकतो. एफडीएकडून तशी तपासणीही सुरू झाली आहे.- गोपाल माहोरे, अन्न सुरक्षा निरीक्षक, यवतमाळ

यवतमाळ शहरात   तेलाचे तीन नमुने घेतले

अन्न सुरक्षा विभागाने आता हाॅटेल्समध्ये तेलाच्या वापराबाबत ‘रुको’ सिस्टिम आणली आहे. तळलेले जुने तेल बायोडिझल कंपनीला विकले जाते.

जुन्या तेलामध्ये नवीन तेल टाकून त्याचा वापर पाच दिवसांपर्यंत करता येतो. २५ टीपीसी पेक्षा अधिक रिडिंग असलेले तेल वापरण्यास मनाई आहे.

 

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य