शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मी एमएलसी, मुलाला एमएलए बनवा !

By admin | Updated: August 19, 2014 23:57 IST

प्रस्थापित नेत्यांविरुद्ध जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्ययही आला. त्यानंतरही काँग्रेसची नेते मंडळी ‘मी आणि माझे’ ही घराणेशाही सोडण्यास तयार नाही.

माणिकराव ठाकरेंची घराणेशाही : प्रदेशाध्यक्षांकडूनच राज्यभर चुकीचा संदेश, काँग्रेस कार्यकर्ते नाराज यवतमाळ : प्रस्थापित नेत्यांविरुद्ध जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्ययही आला. त्यानंतरही काँग्रेसची नेते मंडळी ‘मी आणि माझे’ ही घराणेशाही सोडण्यास तयार नाही. स्वत: एमएलसी असताना माणिकराव ठाकरेंनी मुलाला एमएलए बनविण्यासाठी जोरदार धडपड चालविल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप पहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांपुढे वेगळा आदर्श निर्माण करणे अपेक्षित आहे. मात्र तेच चुकीच्या वाटेने जाऊन पक्षालाही चुकीच्या मार्गावर नेत असल्याचे विदारक चित्र आहे. त्यांच्या वागणुकीने राज्यभरातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश पोहचू लागला आहे. दिग्रस-दारव्हा हा माणिकराव ठाकरे यांचा परंपरागत मतदारसंघ आहे. परंतु मी प्रदेशाध्यक्ष असल्याने मला पक्ष परवानगी देणार नाही, असे कारण पुढे करीत माणिकरावांनी विधानसभेचे मैदान सोडले आहे. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहूल गांधी स्वत: लोकसभेच्या आखाड्यात उतरू शकतात, मग नेमकी माणिकरावांनाच काँग्रेस पक्ष परवानगी कशी काय नाकारु शकतो, याचे कोडे सामान्य जनतेला उलगडलेले नाही. वास्तविक माणिकरावांनी तर स्वत: विधानसभेच्या रिंगणात उतरुन शक्यतोवर निवडणूक बिनविरोध करून अथवा एकही दिवस प्रचाराला न येता मताधिक्याने निवडून येऊन आदर्श निर्माण करणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांची मतदारसंघात तेवढी पकड असणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात स्थिती अगदीच याच्या विपरित आहे. त्यांच्या मतदारसंघातच कुणी त्यांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)