शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांसाठी महिला उमेदवारांची शोधाशोध

By admin | Updated: October 7, 2016 02:33 IST

नगरपरिषदेच्या विस्ताराने बदललेल्या राजकीय समीकरणात नगराध्यक्षांसाठी महिला उमेदवार शोधण्याची वेळ राजकीय पक्षांवर आली आहे.

राजकीय पक्षाचा कस : इच्छुकांच्या गर्दीतून नेत्यांची सुटका यवतमाळ : नगरपरिषदेच्या विस्ताराने बदललेल्या राजकीय समीकरणात नगराध्यक्षांसाठी महिला उमेदवार शोधण्याची वेळ राजकीय पक्षांवर आली आहे. सक्रिय राजकारणात अपवाद सोडता सर्वच राजकीय पक्षात महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. आरक्षणातून आलेल्या महिलांना स्वत:ची इमेज तयार करताच येत नाही. या स्थितीत जनतेतून थेट महिला नगराध्यक्ष विस्तारलेल्या यवतमाळ शहरात द्यायचा आहे. यासाठी सक्षम उमेदवार कोण हा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांपुढे आहे. यवतमाळ नगरपरिषदही जिल्ह्याच्या राजकारणात प्रतिष्ठेची आहे. शिवाय दोन राज्यमंत्री आणि विधान परिषद उपसभापती या पालिकेत वास्तव्याला आहेत. सत्ताधारी भाजपा, शिवसेना येथे स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे. तर गेल्या काही दशकापूर्वी पालिकेतील सत्ता गमवालेल्या काँग्रेसला पुन्हा एन्ट्री करायची आहे. अशा स्थितीत जनतेतील नगराध्यक्ष तीही महिला द्यावी लागणार आहे. सर्वच पक्षात महिला आघाड्या आहेत. संपूर्ण शहरात प्रभाव निर्माण करेल, जनतेचा कौल मिळेल, असा एकही चेहरा शहराच्या राजकीय सरीपाटावर नाही. या स्थितीत काही पक्षांना ऐनवेळेवर उमेदवार आयात करावे लागणार आहे. परंपरागत चेहरे निवडणूक रिंगणात कितपत चालणार याचाही विचार पक्षस्तरावर केला जात आहे. पालकमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री मदन येरावार, यांच्यासाठी यवतमाळ नगर परिषद प्रतिष्ठेची आहे. तसेच विधान परिषद उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनाही पालिकेच्या राजकारणातून मोडकळीस आलेल्या काँग्रेसचे पुनरूज्जीवन करावे लागणार आहे. शहरात नव्याने समाविष्ठ झालेल्या सात ग्रामपंचायतीत काँग्रेसला सातत्याने जनाधार लाभला आहे. तर नगरपरिषद क्षेत्रात भाजपाची कायम सरशी राहिली आहे. शिवसेनेने विधानसभेतील यशानंतर नगरपरिषदेतही आपल्याला पसंती मिळेल या आशेने व्युहरचना आखणे सुरू केले आहे. बसपाही या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. नगराध्यक्षांसाठी इच्छुक असलेल्यांनी आरक्षण सोडतीपूर्वीच मोर्चेबांधणी सुरू केली होती. खुल्या प्रवर्गातील खुल्या जागेसाठी अनेक पुरुष आखाड्यात उतरण्यास तयारी करीत होते. भाजपातच दावेदारांची मोठी फौज होती. तशीच स्थिती काँग्रेस, शिवसेनेतही होती. ऐनवेळी महिला आरक्षण आल्याने इच्छुकांच्या गर्दीतून पक्षीय नेत्यांची सुटका झाली आहे. नगराध्यक्षांच्या उमेदवारीवरून इच्छुकांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ पक्षीय नेत्यांवर आली होती. सुर्दैवाने हा तिढा महिला आरक्षणामुळे सुटला आहे. आता सक्षम महिला उमेदवार शोधण्यावर भर दिला जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)