शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

रुपांतरित कर्जापासून शेकडो शेतकरी वंचित

By admin | Updated: September 3, 2014 23:45 IST

गतवर्षी अतिवृष्टीने तर यावर्षी कमी पावसाने शेतकरी देशोधडीला लागला आहे. अशातच ३० जून रोजी कर्जाचे हप्ते पाडून रुपांतरित कर्ज वाटप करण्याचे ठरविण्यात आले. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही.

महागाव : गतवर्षी अतिवृष्टीने तर यावर्षी कमी पावसाने शेतकरी देशोधडीला लागला आहे. अशातच ३० जून रोजी कर्जाचे हप्ते पाडून रुपांतरित कर्ज वाटप करण्याचे ठरविण्यात आले. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. जिल्ह्यातील शेकडो शेतकरी या रुपांतरित कर्जापासून वंचित असल्याचे दिसत आहे.यंदा सुरुवातीपासून पावसाने दडी मारली. कसे बसे तग धरलेल्या पिकांवर किडींनी आक्रमण केले. सोयाबीन पिवळे पडत असून कापसाच्या उत्पादनातही मोठी घट येण्याची लक्षणे आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणतेच पॅकेज शासनाने घोषित केले नाही. उलट जिल्हा बँक रुपांतरित कर्ज वाटपाचे आश्वासन देऊन बसली असताना आता कुठे नाबार्ड आणि महाराष्ट्र बँकेकडे बोट दाखवित आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने रुपांतरित कर्जाचे वाटप जिल्ह्यातील कोणत्याही शाखेत केले नाही. त्यामुळे अशा कर्जापासून जिल्हाभरातील ५० हजार शेतकरी वंचित राहिले आहे. जिल्हा बँकेत विचारणा केली तर नाबार्डकडून कर्ज पुरवठा झाला नसल्याने वाटप करता आले नाही, असे सांगितले जाते. नाबार्ड महाराष्ट्र बँकेला पत्रव्यवहार करण्यात आले असून अद्यापही सकारात्मक उत्तर आले नाही.जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज पुरवठा झाला नसल्याने एकट्या महागाव तालुक्यात २८ सोसायट्यातील २९ हजार ११० सभासदांपैकी तीन हजार ४४७ सभासद वंचित आहे. सरासरी तालुक्यातील सदस्यांची आकडेवारी पाहता विविध कार्यकारी सोसायट्यातील ४८ हजार शेतकरी कर्जापासून वंचित राहिले आहे. अशा सभासदांकरिता आता बँकेने पुढाकार घेऊन काही तरी उपाययोजना करावी, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नसल्याचे दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)