शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील शेकडो अपंग विद्यार्थी वाऱ्यावर

By admin | Updated: September 22, 2014 23:35 IST

उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा व इतर काही खासगी शाळांमध्ये शेकडो अपंग विद्यार्थी मोठ्याप्रमाणात शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तसेच साहित्य

बिटरगाव : उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा व इतर काही खासगी शाळांमध्ये शेकडो अपंग विद्यार्थी मोठ्याप्रमाणात शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तसेच साहित्य पुरविण्यासाठी तालुका समन्वयक, विषयतज्ञ, अपंग अध्यापन शिक्षक अशा दहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती शासनातर्फे करण्यात आली आहे. परंतु हे कर्मचारी त्यांचे कर्तव्य गांभिर्याने बजावत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अपंग विद्यार्थ्यांचे मात्र मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. उमरखेड तालुक्यात तालुका समन्वयक व विषयतज्ञ म्हणून त्र्यंबक परवरे व अशोक गिरी यांची नियुक्ती केली आहे. तर फिरते विशेष शिक्षक म्हणून प्रमोद शिंदे, बालाजी बीचे, रंजना सावळे, गजानन जाधव, आदिनाथ जाधव, वैभव वाकडे, दीपक नेवरे, शरद आटे अशा दहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु या सर्व कर्मचाऱ्यांचा संबंधित अपंग विद्यार्थ्यांना कोणताही लाभ होत नाही. ग्रामीण भागातील शाळांमधील अपंग विद्यार्थ्यांना हे समन्वयक अथवा विशेष शिक्षक कधी देत नसल्याचे तक्रारी अपंग विद्यार्थ्यांच्या पालकांमधून होत आहे. अपंग विद्यार्थ्यांसाठी असलेले हे सर्व शिक्षक व तज्ञ दिवसभर पंचायत समितीमध्ये बसलेले आढळतात. शाळेला भेट देण्याची कधीकाळी त्यांची इच्छा झाल्यास ते उमरखेड शहरातीलच अथवा शहराजवळील एखाद्या शाळेला भेट देऊन थातूर-मातूर कर्तव्य पार पाडतात. परंतु जंगल भागातील व तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या शाळांना हे कर्मचारी कधीही भेट देत नाही. त्यामुळे शासनाकडे अपंगांच्या कल्याणासाठी कितीही चांगल्या योजना असल्या तरीही त्या योजनांची अंमलबजावणी संबंधित यंत्रणेमार्फत योग्यरित्या होत नाही. ही यंत्रणाच भ्रष्ट व बोगस आहे. यावर तालुक्यात शिक्कामोर्तब झालेला आहे. यासंदर्भात अनेक वेळा वरिष्ठांकडे तक्रारी करूनसुद्धा या गंभीर प्रकाराची दखलच घेतल्या जात नाही. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडूनच अभय असल्याचा आरोप पालकवर्गातून होत आहे. यामध्ये तालुक्यातील शेकडो अपंग विद्यार्थ्यांचा विकास मात्र खुंटला आहे. (वार्ताहर)