शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
2
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
3
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
4
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
5
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
6
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
7
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
8
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
9
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
10
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
11
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
12
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
13
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
14
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
15
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
16
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
17
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
18
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
19
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
20
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

हिवरी आरएफओ पुसद विभागातही वादात

By admin | Updated: January 28, 2016 02:27 IST

यवतमाळ वन विभागातील हिवरी वन परिक्षेत्रात नियोजनच्या निधीतून झालेली तीन कोटींची जलयुक्त शिवारची कामे चौकशीच्या कक्षेत असतानाच पुसद विभागातील प्रकारही पुढे आला आहे.

८० लाखांची पाणलोटची कामे : तीन कोटींच्या जलयुक्त शिवारची कामे चौकशीत
यवतमाळ : यवतमाळ वन विभागातील हिवरी वन परिक्षेत्रात नियोजनच्या निधीतून झालेली तीन कोटींची जलयुक्त शिवारची कामे चौकशीच्या कक्षेत असतानाच पुसद विभागातील प्रकारही पुढे आला आहे. हिवरीचे आरएफओ पुसदला कार्यरत असताना विदर्भ पाणलोटची ८० लाख रुपयांची कामे चांगलीच गाजली होती.
संपूर्ण जिल्ह्यातच जलयुक्त शिवारच्या पाण्याची खळखळ पाहायला मिळते. वन खात्याने यवतमाळ विभागात जलयुक्त शिवारमध्ये एक रुपयाही निधी यंदा दिला नाही आणि कामेही झाली नाही. परंतु जिल्हा नियोजन समितीच्या सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात जारी झालेल्या निधीतून जिल्हाभर मोठ्या प्रमाणात कामे घेतली गेली. कृषी विभाग व वन विभाग या दोनही खात्यांतर्गत झालेल्या कामांमध्ये प्रचंड घोळ आहे. भाजपा-शिवसेनेचे कार्यकर्तेच जलयुक्त शिवारच्या पाण्यात ‘चिंब’ झाले. यवतमाळलगतच्या हिवरी वन परिक्षेत्रात तीन कोटींची कामे जलयुक्त शिवारमध्ये केली गेली. त्यातील दीड कोटींची कामे भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांच्या नावावर घेतली गेली. त्याची चर्चा सुरू असतानाच हिवरीचे आरएफओ एस.जी. हटकर यांची पुसदला वनपाल असतानाचे कारनामेही उघड होत आहे. पुसदला विदर्भ पाणलोटच्या ८० लाखांच्या कामात त्यांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केला होता. स्वत:च मशीनने कामे केली, ती निकृष्ट दर्जाची होती. या कामांच्या अभिलेख्यांचा (कॅश बुक) वाद चांगलाच गाजला होता. पुसदचे तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी बी.के. चव्हाण यांनी पाणलोटच्या या कामांचे लेखे गहाळ केल्याची चर्चा यावेळी होती. या प्रकरणात एका वन मजुराच्या नेत्याने मध्यस्थी करून प्रकरण मिटविले होते. विशेष असे पुसद पाणलोट प्रकरणात हटकर आणि तत्कालीन पुसद डीएफओ जी.एस. बल्की यांना चार्जशिटसुद्धा दिली गेली होती. मात्र वरिष्ठ मेहेरबान झाल्याने त्यावेळी कारवाई टळली होती. त्याच हटकर यांच्या कारनाम्यांनी आता हिवरी वनपरिक्षेत्र गाजत आहे. हटकर यांचा यवतमाळ वन परिक्षेत्रावर डोळा आहे. येथील आरएफओ शंकर मडावी यांना हूसकून लावून त्यांच्या जागेवर वर्णी लावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याला पर्याय म्हणून त्यांनी उमरखेड वन परिक्षेत्र ठेवले आहे. त्यासाठी उमरखेडमध्ये भाजपाच्या गोटात हिवरीतून फिल्डींग लावली जात असल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)