शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांचे कलेवर घरात असताना जुळ्या बहिणींनी दिला दहावीचा पेपर

By admin | Updated: March 8, 2015 02:00 IST

वर्षभर दहावीचा चिकाटीने अभ्यास केला. इंग्रजीच्या पेपरच्या आदल्या दिवशी वडिलांचे हृदयाघाताने निधन झाले.

यवतमाळ : वर्षभर दहावीचा चिकाटीने अभ्यास केला. इंग्रजीच्या पेपरच्या आदल्या दिवशी वडिलांचे हृदयाघाताने निधन झाले. वडिलांचे कलेवर घरात असताना हृदयावर दगड ठेवत जुळ्या बहिणींनी दहावीचा पेपर दिला. नियतीने कुणावरही आणू नये, असा प्रसंग या दोन बहिणीवर आला. यवतमाळच्या शहीद सोसायटीतील या जुळ्या बहिणींना शनिवारी दुहेरी परीक्षेला सामोरे जावे लागले. यवतमाळातील व्यावसायिक जोएफ अली ताजुद्दीन लिराणी (४२) यांचे अमरावती येथे शुक्रवारी हृदयाघाताने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त घरी कळताच परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. प्रत्येकजण धाय मोकलून रडत होता. अशातच दहावीत असणाऱ्या नमीरा आणि इनारा या दोन मुलींचा शनिवारी इंग्रजीचा पेपर होता. वडिलांच्या निधनाने या दोन मुलींचे विश्वच हरविले होते. आता या मुलींच्या परीक्षेचे काय होणार, असा प्रश्न नातेवाईकांना पडला. वडिलांचे कलेवर पाहून धाय मोकलून रडणाऱ्या नमिरा आणि इनाराने मात्र परीक्षेला जायचा निर्णय घेतला. घरात वडिलांचे कलेवर असताना हृदयावर दगड ठेवून या दोन बहिणी इंग्रजीच्या पेपरसाठी शहरातीलच एका परीक्षा केंद्रावर पोहोचल्या. परीक्षेत मन लागत नव्हते. मात्र वर्ष वाया जाईल यातून या दोघीही जुळ्या बहिणींनी महत्प्रयासाने पेपर लिहिला. (नगर प्रतिनिधी)आगळी-वेगळी श्रद्धांजलीजोएफचे आपल्या नमिरा आणि इनारा या दोन मुलींवर जिवापाड प्रेम होते. पहिल्या पेपरला जोएफ आपल्या दोन्ही मुलींना घेऊन परीक्षा केंद्रावर गेले होते. परीक्षेच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. इंग्रजीच्या पेपरच्या आदल्या दिवशी जोएफ यांचे निधन झाले. घरात वडिलांचे कलेवर होते. मात्र त्याचवेळी वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या परीक्षा केंद्रावर पोहोचल्या आणि वडिलांना आगळी-वेगळी श्रद्धांजली अर्पण केली.