शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

नवख्या सशस्त्र तरुणांचा तासभर धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:35 IST

गेली काही महिने काहीसे शांत असलेल्या गुन्हेगारी वर्तुळात पुन्हा जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ते पाहता लगतच्या भविष्यात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची चिन्हे दिसू लागली आहे. अशाच टोळीशी कनेक्ट असलेल्या १८ ते २० वर्ष वयाच्या १५ ते २० नवख्या सशस्त्र तरुणांनी बुधवारी सायंकाळी साई मंदिर-बाजोरियानगर भागात एक ते दीड तास हातात शस्त्रे घेऊन धुमाकूळ घातला.

ठळक मुद्देतिघांवर हल्ला : तलवारी, कोयत्यांचा वापर, अवधूतवाडी पोलीस ठाणे अस्तित्वात आहे का ?

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेली काही महिने काहीसे शांत असलेल्या गुन्हेगारी वर्तुळात पुन्हा जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ते पाहता लगतच्या भविष्यात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची चिन्हे दिसू लागली आहे. अशाच टोळीशी कनेक्ट असलेल्या १८ ते २० वर्ष वयाच्या १५ ते २० नवख्या सशस्त्र तरुणांनी बुधवारी सायंकाळी साई मंदिर-बाजोरियानगर भागात एक ते दीड तास हातात शस्त्रे घेऊन धुमाकूळ घातला. दोन ते तीन जणांवर जीवघेणा हल्ला केला. हा थरार सुरू असताना अवधूतवाडी पोलिसांचे अस्तित्व कुठेही जाणवले नाही. या थरारामुळे त्या परिसरातील नागरिकांमध्ये मात्र दहशतीचे वातावरण आहे.
अवधूतवाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जामनकरनगर, आठवडी बाजार, तारपुरा, डेहणकर ले-आऊट, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, शनिमंदिर चौक या भागात या टोळक्यांचा हैदोस बुधवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास सुरू होता. १५ ते २० सदस्य हाती तलवारी, कोयते, लोखंडी पाईप, काठ्या घेऊन एक ते दीड तास धुमाकूळ घालत असताना अवधूतवाडी पोलिसांना मात्र याची खबरबात नव्हती. ते पाहता अवधूतवाडी पोलीस ठाणे अस्तित्वात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
बुधवारी सकाळी अमन पांडे रा. डेहणकर ले-आऊट भोसा रोड या तरुणाला सकाळी १० वाजता रोहण इंगळे, पवन काकडे, आकाश हेमणे यांनी घरी जाऊन आपसी वादातून मारहाण केली. या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. दरम्यान आपल्या जीवाला धोका होऊ शकतो, असे कैफियत घेऊन रोहण हा वडिलांसह बुधवारी दुपारीच अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र पोलिसांनी त्याची फारशी दखल घेतली नाही. त्याला परत पाठविण्यात आले.
लोहारा येथेही दोन गटांत झडप
संघटित गुन्हेगारी व टोळीयुद्धासाठी ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ शहरात पुन्हा गुन्हेगारी डोकेवर काढताना दिसत आहे. बुधवारचा धुमाकूळ ताजा आहे. त्याच्या दोनच दिवसापूर्वी लोहारातही दोन गटांत झडप झाली. या प्रकरणात ३०७ ऐवजी ३२६ चे कलम लावून तीव्रता दडपण्यात आली. त्यात अद्याप कुणालाही अटक झाली नाही.
कोयत्याने मुंडके उडविण्याचा होता डाव, हातावर निभावले
अखेर सायंकाळी ७.३० वाजता १५ ते २० युवकांच्या टोळक्याने हाती तलवारी, कोयते घेऊन रोहणचा शोध सुरू केला. बेसावध असलेला रोहण त्यांच्या हाती लागला. त्यांनी रोहणवर प्राणघातक हल्ला केला. त्याला चाकूने भोसकण्यात आले. कोयत्याने त्याची मुंडके उडविण्याचा प्लॅन होता. त्या दृष्टीने हल्लाही केला गेला. मात्र हात आडवा केल्याने मुंडके वाचले. रोहणच्या हाताला जबर दुखापत झाली. या प्रकरणी तातू मुराब, सोनू मुद्दसर, मिया ठाकूर, अमन पांडे, तेजस ढोंगे व इतर सहा ते सात जणांविरुद्ध प्राणघातक हल्ला, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी, दंगा, शस्त्र बाळगणे आदी कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. रोहणने आरडाओरड केली नसती आणि गर्दी जमली नसती तर कदाचित खुनासारखी गंभीर घटना घडली असती.
घरफोड्या वाढल्या
अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून मारहाणीसोबतच मालमत्तेचे गुन्हे प्रचंड वाढले आहे. दरदिवशी कुठे ना कुठे मंगळसूत्र चोरी, घरफोडी या सारखे गुन्हे घडत आहेत. या वाढत्या घटना अवधूतवाडी पोलीस ठाणे व त्यांच्या स्थानिक वरिष्ठांचे अपयश अधोरेखीत करणाºया ठरत आहेत.