पोषण आहार कामगारांचे मानधन अखेर बँकेत जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 05:00 AM2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:01:10+5:30

शालेय पोषण आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनिस महिलांना मासिक हजार रुपयांचे मानधन मिळते. मात्र हे मानधन कधीच वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहे. आता लॉकडाऊनमध्ये इतर रोजगार उपलब्ध नसल्यामुळे या महिलांना मानधनाचाच आधार होता. परंतु, दप्तर दिरंगाईमुळे दोन महिन्यांचे मानधन खोळंबले होते.

The honorarium of the nutrition workers is finally deposited in the bank | पोषण आहार कामगारांचे मानधन अखेर बँकेत जमा

पोषण आहार कामगारांचे मानधन अखेर बँकेत जमा

Next
ठळक मुद्देप्रतीक्षा संपली : अखेर बँक बदलून खात्यात टाकावे लागले पैसे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिला कामगारांचे मानधन गेल्या तीन महिन्यांपासून अडकून पडले आहे. अखेर शिक्षण विभागाने या कामागारांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी बँक खात्यात वळता केला आहे.
शालेय पोषण आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनिस महिलांना मासिक हजार रुपयांचे मानधन मिळते. मात्र हे मानधन कधीच वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहे. आता लॉकडाऊनमध्ये इतर रोजगार उपलब्ध नसल्यामुळे या महिलांना मानधनाचाच आधार होता. परंतु, दप्तर दिरंगाईमुळे दोन महिन्यांचे मानधन खोळंबले होते.
थेट राज्य स्तरावरून येणारे हे मानधन जिल्हा बँकेच्या खात्यातून शाळांपर्यंत वळते केले जाते. जिल्हा बँक निधी वितरणासाठी ‘येस बँके’चा आयएफएससी कोड वापरते. काही दिवसांपूर्वी येस बँकेवर आर्थिक निर्बंध घातले गेले होते. त्यामुळे जिल्हा बँकेत जमा झालेला पोषण आहाराचा निधीही कामगारांच्या खात्यात वळते करण्यात अडचणी आल्या होत्या. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण संचालनालयाशी संपर्क साधल्यावर तोडगा निघाला.
अखेर गुरुवारी जिल्हा बँकेऐवजी आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून १ कोटी ४२ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा निधी वळता करण्यात आला. मार्च आणि एप्रिल महिन्यातील हे प्रलंबित मानधन मे महिन्याच्या अखेरीस कामगारांना मिळतेय.

पंचायत समितीनिहाय आलेले मानधन
४आर्णी ८,२५००, बाभूळगाव ५,४३००, दारव्हा ९,५७०००, दिग्रस ७,२३०००, घाटंजी ८,५२०००, कळंब ७,२९०००, महागाव ११,७३०००, मारेगाव ६,०३०००, नेर ८,६८,५००, पांढरकवडा ८,०७०००, पुसद १६,३५०००, राळेगाव ६,९०,०००, उमरखेड १३,७७,०००, वणी ८,०,७०००, यवतमाळ ९,७८,०००, झरी ६,७२,००० असा १ कोटी ४२ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा निधी वळता करण्यात आला.

Web Title: The honorarium of the nutrition workers is finally deposited in the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.