शहरं
Join us  
Trending Stories
1
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
2
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
3
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
6
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
7
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
8
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
9
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
10
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
11
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
12
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
13
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
14
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
15
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
16
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
17
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
18
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
19
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
20
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी-मराठी गीतांची मेजवाणी

By admin | Updated: January 25, 2016 03:47 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना

यवतमाळ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने संगीत क्षेत्रातील दिग्गज कलावंतांचा ‘स्वरांजली’ हा हिंदी-मराठी सुमधूर गीतांचा कार्यक्रम समता मैदानात शनिवार, २३ जानेवारीला आयोजित करण्यात आला होता.
दीप प्रज्वलनानंतर पं.सुरेश वाडकर यांनी प्रारंभी ‘ओंकार स्वरूप, सद्गुरू समर्था’ हे भक्तिगीत सादर करून दमदार सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सलगपणे ‘फिर कुछ नही भाता, जब प्रेम रोग लग जाता’, ‘और इस दिल मे क्या रखा है, ये तेरा ही दर्द छुपा रखा है’ आणि ‘लगी आज सावन की फिर ओ झडी है’ ही गाणी सादर करून हवेतील गारवा पळवून लावला. त्यानंतर आघाडीचा गायक आणि पंडितजींचा शिष्य स्वप्नील बांदोडकर यांनी तरुणांना डोलायला लावले. टाईमपास चित्रपटातील ‘मला वेड लागले प्रेमाचे’ या गाण्यापासून ‘जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू’ ‘राधा ही बावरी’ ‘शिवसेना गीत’ गाऊन प्रचंड ऊर्जा निर्माण केली.
पंडितजींचे दुसरे शिष्य अमेय दाते यांनी विठ्ठल माऊलींचे स्मरण करून देवा श्री गणेशाला वंदन केले. ‘मोहब्बत बरसा देना तू, सावन आया है’ ही सर्वांगसुंदर गाणी म्हणून रसिकांना डोलायला लावले.
संगीताची साधक साधना सरगम यांनी त्यांचे अत्यंत आवडते गाणे ‘निले-निले अंबर पर, चांद जब आये’ ने श्रोत्यांना जिंकून घेतले. गाण्यांचा गुलदस्ता सादर करताना ‘हर किसी को नही मिलता यहां प्यार जिंदगी मे’ ‘सात समंदर पार मै तेरे पिछे पिछे आ गयी’ ही अजरामर गाणी सादर केली. सुरेश वाडकर आणि साधना यांनी द्वंद्वगीतेही सादर केली. ‘मै तुझे कल भी प्यार करता था, मै तुझे अब भी प्यार करता हू’ ‘तुझ्या माझ्या संसाराला आणिक काय हवं’ ‘तुमसे मिलके ऐसा लगा’ या गाण्यांवर अनेकांना ठेका धरला.
सूत्रसंचालन अभिजित खांडकेकर यांनी पंडितजींना बाळासाहेबांच्या काही आठवणी सांगण्याचा आग्रह केला, तेव्हा ते म्हणाले ‘बाळासाहेबांनी माझ्यावर मुलासारखे प्रेम केले. त्यांच्याशी आमचे घरगुती संबंध होते. त्यांच्या छत्रसायेतच आम्ही वाढलो. बळीराजांच्या प्रेमाखातर मी या कार्यक्रमासाठी आलो आहे व कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर आणि अमेय दाते यांनी संयुक्तपणे ‘रात के ढाई बजे, कोई शहनाई बजे’ ‘सपने मे मिलती हैं, वो कुडी मेरी सपने मे मिलती हैं’ ‘चप्पा चप्पा चरखा चले’ अशी लोकप्रिय गाणी सादर करून वातावरणात आनंदाची पेरणी केली. पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर, संतोष ढवळे, प्रवीण पांडे, सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. थंडी असूनही दिग्गज कलावंतांना प्रत्यक्ष पाहता-पाहता त्यांना ऐकण्याची पर्वणी साधण्यासाठी समता मैदान खचाखच भरले होते.
(सांस्कृतिक प्रतिनिधी)