महामार्गावर अपघात; यवतमाळ येथील दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 03:22 PM2020-11-14T15:22:08+5:302020-11-14T15:23:29+5:30

Accident : प्रविण हिरामण शिरभाते(४७) शुभम दत्तात्रय गादेवार (२५) असे मृताचे नाव आहे. 

Highway accidents; Two killed, two seriously injured of Yavatmal | महामार्गावर अपघात; यवतमाळ येथील दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

महामार्गावर अपघात; यवतमाळ येथील दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार करेवाड यांनी रात्री घटनास्थळ गाठले. जखमींना शासकीय रुग्णालयात हलविले. रस्त्यावरील क्षतिग्रस्त वाहन, त्याचे सुटे भाग रात्रीच सुरक्षित ठिकाणी ठेवून वाहतूक सुरळीत केली.

यवतमाळ - येथील उज्वल नगर परिसरात हेमंत अपार्टमेंट येथे राहणाऱ्या दोघांचा मध्यरात्री दीड वाजता कार अपघातातमृत्यू झाला. दोन जण गंभीर जखमी आहेत. प्रविण हिरामण शिरभाते(४७) शुभम दत्तात्रय गादेवार (२५) असे मृताचे नाव आहे. 

पंकज शहा व केतन वानोळे हे दोघे गंभीर जखमी आहेत. हे चारही मित्र उज्वल नगरमध्ये राहतात. शुक्रवारी दत्त चौक स्थित व्यापारी संकुलातील दुकानांची सफाई करून चौघेजण आर्णी रोडवरील हिवरी जवळ असलेल्या धाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा परत येत असताना कीन्ही उड्डाणपुलाच्या खाली हा अपघात झाला. भरधाव वेगाने असलेल्या कारने दुभाजकावर जोरदार धडक दिली. कार धडकेमुळे हवेत उसळली. कारचे इंजिन निखळून काही फूट अंतरापर्यंत जाऊन पडले. अपघातानंतर घटनास्थळावर मोठा आवाज झाला. तो ऐकून तेथील धाब्यावरील युवक बाहेर  आले. अपघाताचे दृश्य पाहून त्यांचाही थरकाप उडाला. ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार करेवाड यांनी रात्री घटनास्थळ गाठले. जखमींना शासकीय रुग्णालयात हलविले. रस्त्यावरील क्षतिग्रस्त वाहन, त्याचे सुटे भाग रात्रीच सुरक्षित ठिकाणी ठेवून वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Highway accidents; Two killed, two seriously injured of Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.