शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य यंत्रणा अलर्ट, ओमायक्राॅन रुग्णांसाठी जिल्ह्यात स्वतंत्र व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST

कोरोनाच्या तपासणीवर आरोग्य विभागाचे कुठलेच नियंत्रण नाही. स्वत:हून नागरिक कोरोना चाचणी करण्यास पुढे येताना दिसत नाही. रेल्वे व विमान प्रवासासाठी आरटीपीसीआर तपासणी अहवाल सक्तिचा केला आहे. त्यामुळे ज्यांना प्रवासाला जायचे आहे, तेच स्वत:हून तपासणी करून घेतात. त्यामुळे रुग्ण पाॅझिटिव्ह आढळण्याचे प्रमाणही कमी आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना महामारीने जिल्ह्यात थैमान घातले होते. कोरोनाची दुसरी लाट तर अतिशय घातक ठरली. डेल्टा व्हेरिएन्टमुळे अनेकांना रुग्णालयात भरती व्हावे लागले. त्या काळात आरोग्याची पूर्ण यंत्रणा कोलमडल्याचे चित्र होते. आता पुन्हा ओमायक्राॅन हा नवा विषाणू संसर्ग होत आहे. नागपूरमध्ये याचे रुग्ण आढळले आहेत. त्या धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेशी ऑक्सिजन व्यवस्था आहे. संभाव्य संसर्ग लक्षात घेऊन तीन पटीने खाटांचे नियोजन केले जात आहे. याशिवाय गरज भासल्यास आरोग्य विभागाला पुन्हा मनुष्यबळही घेतले जाणार आहे. 

प्रवासासाठी जाणारेच करतात तपासणी - कोरोनाच्या तपासणीवर आरोग्य विभागाचे कुठलेच नियंत्रण नाही. स्वत:हून नागरिक कोरोना चाचणी करण्यास पुढे येताना दिसत नाही. रेल्वे व विमान प्रवासासाठी आरटीपीसीआर तपासणी अहवाल सक्तिचा केला आहे. त्यामुळे ज्यांना प्रवासाला जायचे आहे, तेच स्वत:हून तपासणी करून घेतात. त्यामुळे रुग्ण पाॅझिटिव्ह आढळण्याचे प्रमाणही कमी आहे. 

१७०० खाटा रुग्णांसाठी आरक्षित    कोरोना महामारी संसर्ग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून पुरेशी उपाययोजना करण्यात आली होती. त्यामुळेच दोन्ही लाटा यशस्वीपणे थोपविता आल्या. आता ओमायक्राॅन संसर्ग नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज केली जात आहे. सध्या एक हजार ७६५ खाटा आरक्षित आहेत. - डाॅ. तरंगतुषार वारेजिल्हा शल्यचिकित्सक, यवतमाळ 

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या