शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सखी मंचच्यावतीने ‘पांढरे डाग’ विषयावर मार्गदर्शन शिबिर

By admin | Updated: August 22, 2014 00:08 IST

लोकमत-समाचार-टाईम्स सखी मंचच्यावतीने आणि डॉक्टर्स असोसिएशनच्या सहकार्याने ‘पांढरे डाग’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन २४ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता येथील

यवतमाळ : लोकमत-समाचार-टाईम्स सखी मंचच्यावतीने आणि डॉक्टर्स असोसिएशनच्या सहकार्याने ‘पांढरे डाग’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन २४ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता येथील दर्डा मातोश्री सभागृहात करण्यात आले आहे. यावेळी पुणे येथील डॉ. माया तुळपुळे मार्गदर्शन करणार असून, ‘नितळ’ चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला आहे. शरीरावर येणाऱ्या पांढऱ्या डागांना इंग्रजीत ल्युकोडर्मा असे म्हणतात. पांढरे डाग असणाऱ्या व्यक्तीला मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. खरे तर शरीरावरील पांढरे डाग म्हणजे कोणताही आजार नाही. शरीरात रंगाच्या काही कोषीका असतात त्या त्वचेचा रंग सावळा किंवा गोरा करतात. या कोषीकांना शरीर स्वत:हूनच नष्ट करतो. जेव्हा कोषीकांची संख्या कमी होते तेव्हा शरीरावर पांढरे डाग दिसने सुरू होतात. त्वचेवर असणाऱ्या या डागांचा इतर भागावर मात्र कोणताही परिणाम होत नाही. परंतु हा आजार झाला की, पीडित व्यक्ती निराशाजनक होते. अशा व्यक्तींमध्ये आशेचा नवा किरण निर्माण करण्याचा प्रयत्न पुणे स्थित श्वेता असोसिएशन करीत आहे. त्याअंतर्गतच यवतमाळात या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. माया तुळपुळे या जनरल सर्जरीमध्ये एम.एस. असून, विविध ठिकाणी त्यांनी मार्गदर्शनही केले आहे. याचवेळी डॉ. माया तुळपुळे प्रस्तुत आणि सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर कृत ‘नितळ’ हा चित्रपट दाखविला जाईल. या चित्रपटात विक्रम गोखले, विजय तेंडुलकर, रिमा, निना कुलकर्णी, अमृता सुभाष यांच्यासह प्रतीथयश कलावंतांनी भुमिका साकरली आहे. समाजाची पांढऱ्या डाग असलेल्या व्यक्तीप्रती असलेली नकारात्मक भुमिका बदलून आणि पीडित व्यक्तीमध्ये आशेचा नवा किरण निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन लोकमत सखी मंच आणि डॉक्टर असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे. (उपक्रम प्रतिनिधी)