पालकमंत्र्यांनी सुनावले तरुणीला खडेबोल

By Admin | Updated: October 5, 2015 02:31 IST2015-10-05T02:31:02+5:302015-10-05T02:31:02+5:30

मोबाईलवर बोलत सुसाट दुचाकी चालविणाऱ्या एका तरुणीला खुद्द पालकमंत्र्यांनीच वाहतूक नियमांचे डोज देत खडेबोल सुनावले.

The Guardian told the young woman to eat rubbish | पालकमंत्र्यांनी सुनावले तरुणीला खडेबोल

पालकमंत्र्यांनी सुनावले तरुणीला खडेबोल

दारव्हा मार्ग : सुसाट दुचाकीवर मोबाईल संभाषण
यवतमाळ : मोबाईलवर बोलत सुसाट दुचाकी चालविणाऱ्या एका तरुणीला खुद्द पालकमंत्र्यांनीच वाहतूक नियमांचे डोज देत खडेबोल सुनावले. रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास येथील उद्योग भवनासमोर हा प्रसंग अनेकांनी अनुभवला. सदर तरुणीला वाहतूक पोलिसांच्या हवाली करून तिच्या पालकांंना पाचारण करण्याचे आदेश दिले.
पालकमंत्री संजय राठोड यांचा ताफा सकाळी ११ वाजता दारव्हा मार्गाने जात होता. एक तरुणी आपल्या दुचाकीने सुसाट वेगाने जात होती. त्याचवेळी ती मोबाईलवरही बोलत होती. हा प्रकार पालकमंत्र्यांच्या लक्षात आला. चालकाला सदर दुचाकी थांबविण्याचे सांगितले. तोपर्यंत अनेक वाहनांना कट मारीत सदर तरुणी उद्योग भवनासमोर पोहोचली. एक कार आडवी आल्याने तिची गती मंदावली आणि याच वेळी पालकमंत्र्यांनी आपल्या शासकीय वाहनातून उतरुन तरुणीला थांबविले. मात्र पालकमंत्र्यांनी तिला अडविलेच. वाहतूक नियमांचे डोज देत स्वत:सोबत इतरांचाही जीव धोक्यात का घालतेस असा प्रश्न केला. पालकमंत्री राठोड यांनी सोबत असलेल्या पोलिसांना या तरुणीच्या पालकांना पाचारण करण्याचे आदेश दिले. मात्र सदर तरुणी घाटंजी तालुक्यातील मुरलीची असल्याचे पुढे आले. त्यामुळे सदर तरुणीला वाहतूक शाखेच्या ताब्यात देऊन पालक येईपर्यंत सोडू नका, अशी तंबी दिली. दरम्यान वाहतूक शाखेचा ताफा उद्योग भवनापुढे पोहोचला. सदर तरुणीला वाहतूक शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले. वडील येईपर्यंत तिला तेथेच बसवून ठेवण्यात आले. तसेच दंडात्मक कारवाई करण्यात आली. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The Guardian told the young woman to eat rubbish