शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

भुईमूग दरात २०० रुपये तफावत

By admin | Updated: May 15, 2016 01:58 IST

उन्हाळी भुईमूग बाजारात येताच व्यापाऱ्यांनी नवी शक्कल लढविली आहे. भुईमुगात माती असल्याच्या नावाखाली क्विंटलमागे दीड किलोची कपात करण्यात येत आहे.

उपनिबंधकांचे दुर्लक्ष : मातीच्या नावाखाली कट्टी, शेतकऱ्यांची लूटयवतमाळ : उन्हाळी भुईमूग बाजारात येताच व्यापाऱ्यांनी नवी शक्कल लढविली आहे. भुईमुगात माती असल्याच्या नावाखाली क्विंटलमागे दीड किलोची कपात करण्यात येत आहे. यासोबतच भुईमुगाच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. या प्रकारात शेतकऱ्यांची खुलेआम आर्थिक लूट होत असताना सहकार विभाग गप्प आहे.वातावरणातील सततच्या बदलाने कपाशीचे खोडवा पीक शेतकऱ्यांना घेता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाचे पीक काढून भुईमुगाची लागवड केली. यातून भुईमुगाची लागवड गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली. जिल्ह्यात ११ हजार हेक्टरात भुईमुगाचे उन्हाळी पीक घेण्यात आले.याच काळात भूजल पातळी घसरल्याने शेतकऱ्यांना वेळेपूर्वीच भुईमूग काढावा लागला. वन्यप्राण्यांचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. हातात आलेले पीक शेतकऱ्यांनी यवतमाळच्या बाजारात विक्रिसाठी नेले. व्यापाऱ्यांनी अडवणुकीचे धोरण राबवित ३० किलो मागे अर्धा किलो कट्टीनुसार भूईमुगाची खरेदी सुरू करण्यात आली. क्विंटलमागे दीड किलोची कपात केली जात आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.इतर ठिकाणच्या बाजारपेठेत भूईमुगाचे दर ५ हजार ५०० रुपये क्विंटलच्या घरात पोहोचले आहे. यवतमाळ बाजारात मात्र ५ हजार २०० रुपये एवढेच दर आहेत. यात क्विंटलमागे ३०० रुपयांची तफावत आहे. या संपूर्ण प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सहकार विभागाची आहे. या विभागाचे नियंत्रण सुटल्याने शेतकऱ्यांना शेतमालात कट्टीसोबत दराच्या तफावतीचा सामना करावा लागत आहे. (शहर वार्ताहर)