शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
3
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
4
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
5
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
6
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
7
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
8
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
9
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
10
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
11
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
12
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
13
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
14
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा उधारीवर ग्रामपंचायत निवडणूकीची नामुष्की

By admin | Updated: April 9, 2015 00:06 IST

जिल्ह्यातील ४८६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तर ८१ ग्रामपंचायतीची पोटनिवडणुक होत आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील ४८६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तर ८१ ग्रामपंचायतीची पोटनिवडणुक होत आहे. यासाठी जिल्ह्याला चार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. प्रत्यक्षात ग्रामविकास विभागाने जिल्ह्याकडे ४५ लाख रुपयांचाच निधी वळता केला. यामुळे होणाऱ्या निवडणुका प्रशासनाला उधारीवर पार पाडाव्या लागणार आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चार कोटी रुपये लागणार असल्याचा अहवाल निवडणूक विभागाने पाठविला आहे. यानंतरही ४५ लाखांचाच निधी मिळाल्याने जिल्हा प्रशासनाला उधारीसाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मंडप, वीज, डिझेल, वाहतूक, छपाई, अधिकारी कर्मचाऱ्यांचा भत्ता, खासगी वाहने, स्पिकर, जनरेटर, शिक्के, व्हीडीओ चित्रिकरण, स्ट्राँग रुमची उभारणी, एसटीचे भाडे, पोस्टर्स, बॅनर, स्ट्रम पेट्या, जेवन, चहा आणि नाश्ता याबाबींसाठी लागणारा निधी आणायचा कोठून हा प्रश्न निवडणूक विभागापुढे आहे. यावर विचार होणे गरजेचे असल्याचे दिसून येते. एकंदरीत मागील अनुभव लक्षात घेता निवडणूक विभागाने उधारीवरच काम भागवावे लागणार आहे. (शहर वार्ताहर)जिल्ह्यातील ८१ ग्रामपंचयतींची पोट निवडणूकजुनी बाकी ५१ लाख रुपये२०१० पूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी लागलेल्या निधीपैकी ४१ लाख रुपये अद्यापही मिळाले नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी लागलेल्या निधीतील दहा लाख रुपयांचा निधी अद्यापही मिळायचा आहे. दहा हजार नामांकन दाखलजिल्ह्यातील ४८६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर ८१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी दहा हजार ७०६ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. १० एप्रिल रोजी दुपारी ३ पर्यंत अर्ज परत घेता येणार आहे. यानंतर जिल्ह्यातील अंतिम उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार आहे.