शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय निवासस्थानांची दुरवस्था

By admin | Updated: September 10, 2014 00:01 IST

शहरातील विविध विभागांच्या शासकीय निवासस्थानांची दुरवस्था झाली असून निवासस्थानांच्या दैनावस्थेस शासन आणि प्रशासनाची अनास्था कारणीभूत ठरत आहे़ निवासस्थाने उपलब्ध नसल्याने

मारेगाव : शहरातील विविध विभागांच्या शासकीय निवासस्थानांची दुरवस्था झाली असून निवासस्थानांच्या दैनावस्थेस शासन आणि प्रशासनाची अनास्था कारणीभूत ठरत आहे़ निवासस्थाने उपलब्ध नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना मात्र नाईलाजास्तव भाड्याच्या घरात राहावे लागत आहे.कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, असा शासनाचा आदेशच आहे. त्यामागे जनतेची कामे तत्काळ व्हावीत, असा मुख्य हेतू आहे. याच उदात्त हेतूने काही दशकांपूर्वी शासनाने विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थानांची निर्मिती केली. त्यात तहसील, पोलीस ठाणे, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मोक्याच्या जागी निवासस्थाने बांधण्यात आली. मात्र आता ही निवासस्थानेच वास्तव्य करण्याजोगी उरली नाहीत.निवासस्थानांच्या बांधणीनंतर त्यांच्या देखभालीकडे संबंधित विभागाचे प्रचंड दुर्लक्ष झाले. परिणामी ही निवासस्थाने आता शेवटच्या घटका मोजत आहेत. ती अतिशय जीर्ण झाली. निवासस्थाने राहण्यायोग्य तसेच दुरूस्ती करण्याजोगीही राहिली नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव अनेक कर्मचाऱ्यांना शहरात भाड्याच्या घरात वास्तव्य करावे लागत आहे. शासकीय निवासस्थाने जीर्ण झाल्याने अनेक कर्मचारी अप-डाऊन करीत आहेत. परिणामी काही कर्मचारी नेहमी कार्यालयात उशिरा पोहोचतात. त्यामुळे जनतेची कामे खोळंबतात. या निवासस्थानांची दुरवस्था बघून त्यांच्या दुरूस्तीची आशाही मावळली आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या या निवासस्थानांची स्थिती दयनीय झाली आहे. काही निवासस्थाने अनेक वर्षांपासून बंद असल्याने दारे, खिडक्या चोरटे लंपास करीत आहेत. छतावरील कवेलू व सागवान चोरीस जात आहे. भग्नावस्थेत असलेली ही निवासस्थाने मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनले आहे. अत्यंत दुरवस्थेत असलेल्या काही मोजक्या निवासस्थानांमध्ये काही कर्मचारी अजूनही आपले संसार कसेबसे थाटून त्यात वास्तव्य करीतच आहे.काही निवासस्थानांच्या भींतींना आता तडे गेले. काहींची दरवाजे, खिडक्यांची तावदाने गायब झाली. कवेलू गायब झाल्याने पावसाळ्यात छतावरून पाणी गळत आहे. सोबतच निवासस्थानांभोवती घाण, सांडपाणी, केरकचरा, पिशव्या गोळा झाल्या आहेत. तरीही काही कर्मचारी त्यात आपला संसार थाटून आहेत. मात्र त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात सरपटणारे प्राणी निघत असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेकदा तर पावसाचे पाणी घरातही शिरत आहे. यामुळे त्यांचे कुटुंबीय त्रस्त झाले आहे. या निवासस्थानांच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा जुनी आणि जीर्ण निवासस्थाने पाडून त्या ठिकाणी नवीन निवासस्थानांची निर्मिती करण्याची आवश्यकता आहे. (शहर प्रतिनिधी)