शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय काेविड रुग्णालयातील ५७७ खाटा झाल्या हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 05:00 IST

शासकीय काेविड रुग्णालयात गंभीर व अतिगंभीर स्वरूपाची लक्षणे असलेल्याच रुग्णाला दाखल करण्याचे निर्देश आहेत. काेविड केअर सेंटर आणि काेविड हेल्थ सेंटर येथे  साैम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णावर उपचार करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्ष मात्र तेथे रुग्ण जात नाहीत. त्यांना थेट शासकीय काेविड रुग्णालयातच पाठविण्यात येते. त्यामुळे गरज नसलेल्या रुग्णांनी शासकीय काेविड रुग्णालय भरले आहे.

ठळक मुद्देकाेराेना संशयित ‘वेटिंग’वर : अपघात कक्षात काढली रात्री

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काेराेना महामारीने भयानक रूप धारण केले आहे. शनिवारी रात्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  काेराेनाचे १७ संशयित रुग्ण दाखल झाले. त्यांना रविवारी दुपारपर्यंत वाॅर्डमध्ये हलविण्यात आले नाही.  रुग्णालय प्रशासनाला प्रचंड कसरत करावी लागत आहे.  साैम्य व मध्यम लक्षण असलेले रुग्ण  शासकीय काेविड रुग्णालयात दाखल हाेत असल्याने  काेविड रुग्णालय हाऊसफुल्ल झाले आहे. यामुळे रुग्णांची परवड हाेत आहे.शासकीय काेविड रुग्णालयात गंभीर व अतिगंभीर स्वरूपाची लक्षणे असलेल्याच रुग्णाला दाखल करण्याचे निर्देश आहेत. काेविड केअर सेंटर आणि काेविड हेल्थ सेंटर येथे  साैम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णावर उपचार करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्ष मात्र तेथे रुग्ण जात नाहीत. त्यांना थेट शासकीय काेविड रुग्णालयातच पाठविण्यात येते. त्यामुळे गरज नसलेल्या रुग्णांनी शासकीय काेविड रुग्णालय भरले आहे. याच प्रकारातून  शनिवारी रात्री ऑक्सिजनची गरज असलेले गंभीर रुग्ण रविवारी दुपारपर्यंत ‘वेटिंग’वर हाेते. काेराेनामुळे प्रत्येक जण हादरलेला आहे. थाेडी लक्षण  दिसली तरी संबंधित व्यक्ती थेट रुग्णालयात धाव घेते. यातून शासकीय काेविड रुग्णालयाची यंत्रणा काेलमडण्याच्या मार्गावर आहे. कोविड सेंटरमध्ये रात्रीच्या वेळेस दाखल करण्याची सुविधाही नसल्याचा परिणाम आहे.

रात्री काेविड सेंटर बंद काेविड सेंटर व डेडिकेटेड काेविड हेल्थ सेंटर येथे रात्रीच्या वेळी रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. या ठिकाणी रात्री डाॅक्टर नसतात. त्यामुळे रुग्ण थेट शासकीय काेविड रुग्णालयात जात आहे. परिणामी तेथे रुग्णांची गर्दी वाढली आहे. काेविड सेंटर व हेल्थ सेंटर येथे काेणताच उपचार केला जात नाही, असा समज तयार झाला आहे. डाॅक्टर राहत नसल्याने रुग्णाची पसंती ही शासकीय काेविड हाॅस्पिटलला आहे. 

काेविड रुग्णालयात १०० रुग्ण असे आहेत, ज्याच्यावर काेविड व हेल्थ सेंटर येथे उपचार हाेऊ शकताे. अशा रुग्णामुळे गंभीर व अतिगंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळेत बेड देताना अडचण हाेत आहे. रुग्णांची याेग्य वर्गवारी हाेण्याची गरज आहे. काेविड हाॅस्पिटलवर यामुळे ताण वाढत आहे. - डाॅ. मिलिंद कांबळे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या