शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

माल व्यापार्‍यांचा, सातबारा शेतकर्‍यांचा

By admin | Updated: May 22, 2014 01:35 IST

शेतकर्‍यांच्या पडत्या बाजूचा फायदा व्यापार्‍यांकडून घेतला जात आहे.

घाटंजी : शेतकर्‍यांच्या पडत्या बाजूचा फायदा व्यापार्‍यांकडून घेतला जात आहे. यावर व्यापारी धार्जीण्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कुठलेही नियंत्रण नाही. परिणामी दिवसेंदिवस शेतकरी नाडवला जात आहे. सध्या खरिपाची लगबग सुरू आहे. शेतकर्‍यांना पैशाची गरज आहे. याच बाबींचा गैरफायदा व्यापार्‍यांकडून घेतला जात आहे.

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डवर १५ ते २0 दिवसांपासून ६0 ते ७0 शेतकर्‍यांनी हरभरा विकायला आणला आहे. जवळपास एक हजार २00 ते एक हजार ५00 क्विंटल हरभरा याठिकाणी पडून आहे. हा शेतमाल खरेदी करावा, यासाठी शेतकरी बाजार समितीकडे अर्ज, विनंत्या करत आहे. एकीकडे शेतकर्‍यांचा माल खरेदीस टाळाटाळ केली जात आहे तर दुसरीकडे व्यापार्‍यांचा माल मात्र खरेदी होत आहे. व्यापारी शेतकर्‍यांकडून कमी दरात खरेदी करतात. हाच माल व्यापारी शेतकर्‍यांच्या सातबारावर जादा दराने विकतात.

एकीकडे शेतकर्‍यांच्या मालाला भाव द्यायचा नाही आणि दुसरीकडे व्यापार्‍यांचा माल जादा दराने खरेदी करायचा हे धोरण बाजार समितीने अवलंबिले आहे. प्रशासक आणि सचिव जाणीवपूर्वक शेतकर्‍यांचा माल घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे. मंगळवारी शेतकर्‍यांनी उठाव केला असता तालुका सहायक निबंधकांना पाचारण करण्यात आले. त्यावेळी सचिवाने हरभरा खरेदी करण्याची परवानगी सोमवारपर्यंंतच असल्याचे सांगितले. यावर निबंधकांनी १५-२0 दिवसांपासून पडून असलेल्या हरभरा खरेदी का केला नाही, असा प्रश्न केला. त्यावर प्रशासक आणि सचिव उत्तर देऊ शकले नाही. त्याचवेळी निबंधकांनी तत्काळ खरेदी करण्याच्या सूचना सचिवांना केल्या. मात्र व्यापारी धार्जीण्या सचिव आणि प्रशासकाने हा आदेश धुडकावून लावला.

शेतकर्‍यांना खरिपासाठी बियाणे आणि रासायनिक खते घेण्यासाठी माल विकणे गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन त्यांची अडवणूक सुरू आहे. प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय गोडे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)