शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

अब्बाजानच्या निकाहसाठी मुलींनीच घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 05:00 IST

फिरोज नजर खॉं पठाण (५५) हे वणी तालुक्यातील घोन्सा येथील रहिवासी आहेत. त्यांना यास्मिन अजीज पठाण, शमा फारूख शेख, शाहिन शाकीर शेख व परवीन इरफान खान या चार विवाहित मुली आहेत. फिरोज नजर खॉं पठाण हे त्यांची दिवंगत पत्नी सुलताना यांच्यासह घोन्सा येथे वास्तव्याला होते. मात्र २७ एप्रिलला सुलताना यांचे हृदयविकाराने निधन झाले आणि फिरोज यांच्या आयुष्याला रितेपण आले. पत्नीच्या निधनानंतर ते त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी शमा फारूख शेख यांच्या घरी राहत होते.

ठळक मुद्देवणी शहरातील अनोखी घटना : आयुष्याच्या सायंकाळी मिळाला कुटुंबाचा आधार, समाजापुढे निर्माण केला वेगळा आदर्श

 संतोष कुंडकरलोकमत न्यूज नेटवर्कवणी : तरुणपणात माणसात रग असते, ताकद असते. अशावेळी तारूण्यातील एकाकीपणाचे पान अलगद आणि सहज उलटविता येते. परंतु पत्नीची खरी गरज असते ती आयुष्याच्या सायंकाळीच. कारण वृद्धापकाळात सहचारिणीकडून मिळणारा मानसिक आधारच जगण्यासाठी प्रेरणा सदैैव देत राहतो. वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर असलेल्या व सहा महिन्यांपूर्वी पत्नीचे निधन झाल्यानंतर एकाकी झालेल्या फिरोज नजर खॉ पठाण यांच्याही अंधारलेल्या आयुष्यात उजेड पेरण्यासाठी त्यांच्या चार मुलींनी पुढाकार घेतला आणि या मुलींनी रविवारी सायंकाळी एका विधवा महिलेशी आपल्या ह्यअब्बाजानह्ण चा ह्यनिकाहह्ण लावून देऊन समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला.फिरोज नजर खॉं पठाण (५५) हे वणी तालुक्यातील घोन्सा येथील रहिवासी आहेत. त्यांना यास्मिन अजीज पठाण, शमा फारूख शेख, शाहिन शाकीर शेख व परवीन इरफान खान या चार विवाहित मुली आहेत. फिरोज नजर खॉं पठाण हे त्यांची दिवंगत पत्नी सुलताना यांच्यासह घोन्सा येथे वास्तव्याला होते. मात्र २७ एप्रिलला सुलताना यांचे हृदयविकाराने निधन झाले आणि फिरोज यांच्या आयुष्याला रितेपण आले. पत्नीच्या निधनानंतर ते त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी शमा फारूख शेख यांच्या घरी राहत होते. वडिलांचे एकाकीपण सर्वांनाच अस्वस्थ करणारे होते. त्यामुळे चारही मुली व जावयांनी एकत्र येऊन वडिलांना कुणाचा तरी आधार मिळावा, यासाठी त्यांचा पुन्हा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. फिरोज यांनी मात्र याला विरोध केला. मात्र नंतर तेही विवाहासाठी तयार झालेत. अशातच फिरोज यांची तिसऱ्या क्रमांकाची मुलगी शाहिन हिच्या परिचयातील परवीन मजीद शेख या विधवा महिलेपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. परवीन त्यांच्या आईकडे राहतात. त्यांना वडिल नाहीत. त्यांच्या सर्व बहिणींचे लग्न झाले आहे. त्यांनीही हा प्रस्ताव मान्य केला आणि अखेर विवाहाची तारिख ठरली. रविवारी १८ आक्टोबरला सायंकाळी ५ वाजता परवीन यांच्या घरी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे हा अनोखा विवाह लावून देण्यात आला. यावेळी दोन्ही कुटुंबातील मोजके लोक उपस्थित होते. या विवाहाने समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला आहे.

टॅग्स :marriageलग्न