आॅटोरिक्षा चालकाची मुलगी बारावीत अव्वल

By Admin | Updated: June 3, 2017 00:48 IST2017-06-03T00:48:47+5:302017-06-03T00:48:47+5:30

एका आॅटोरिक्षा चालकाच्या सर्वसाधारण परिवारातील मुलीने बारावीच्या परीक्षेत असाधारण यश प्राप्त केले.

The girl of the autorickshaw driver is at 12th position | आॅटोरिक्षा चालकाची मुलगी बारावीत अव्वल

आॅटोरिक्षा चालकाची मुलगी बारावीत अव्वल

९२.४६ टक्के : अदिबा अनमचे यश
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एका आॅटोरिक्षा चालकाच्या सर्वसाधारण परिवारातील मुलीने बारावीच्या परीक्षेत असाधारण यश प्राप्त केले. अदिबा अनम अशफाक अहेमद हिने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत या परीक्षेत ९२.४६ टक्के गुण प्राप्त केले आहे.
येथील जिल्हा परिषद माजी शासकीय कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी अदिबाचे वडील आटोरिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. विशेष म्हणजे ते उर्दुतील प्रसिद्ध साहित्यीक असून, अशफाक शाज या नावाने साहित्यक्षेत्रात लोकप्रीय आहेत. अशा या परिवारातील गुणवंत आबिदाने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. कोणतेही विशेष मार्गदर्शन नाही की, कोणत्या शिकवणी नाही. स्वयंप्रेरणेने आणि परिवाराच्या मार्गदर्शनाने तीने हे यश प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेतही तीन ९४.२० टक्के गुण प्राप्त केले होते.

Web Title: The girl of the autorickshaw driver is at 12th position