शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जुगारी-बाहेरख्याली मुलाला आवरा हो !

By admin | Updated: May 27, 2015 02:18 IST

माझा मुलगा बाहेरख्याली आहे, अनेक वर्षांपासून राहत्या घरात जुगार भरवितो. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलाला आवरा आणि माझी या जाचातून मुक्तता करा, ...

वृद्ध मातेची याचना : घाटंजी पोलिसांपुढे हात टेकले, अवैध सावकारीचीही ‘पोलखोल’ यवतमाळ : माझा मुलगा बाहेरख्याली आहे, अनेक वर्षांपासून राहत्या घरात जुगार भरवितो. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलाला आवरा आणि माझी या जाचातून मुक्तता करा, अशी याचना एका वृद्धेने पोलिसांकडे केली आहे. जुगार व्यावसायिक मुलगा व घाटंजी पोलिसांची मिलीभगत असल्याने कारवाई होत नसल्याची बाबही त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. रोशनबाई सद्रुद्दीन हिराणी (७६) रा. संदीप टॉकीज परिसर यवतमाळ असे या वृद्धेचे नाव आहे. तिने आर्णी तालुक्याच्या तळणी येथील रहिवासी मुलगा नुरुद्दीन हिराणी याच्या विरोधात घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत रोशनबाईने आपल्या मुलाचे कारनामे नमूद केले असून त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीची पोलखोल स्वत:च केली आहे. त्यानुसार नुरुद्दीन हे वाम मार्गाने लागलेले आहेत. त्यांना वाईट संगत आहे. ते व्यसनाधिन असून घरात जुगार अड्डा चालवितात. गावातच सावकारी करतात, तीन टक्के व्याज दराने पैसे देतात, शेतकऱ्यांना सवाईने पैसा दिला जातो, त्यातून सुमारे ८० हजार रुपये दरमहा व्याज येते. हा मुलगा बाहेरख्याली वृत्तीचा असल्याचे या निवेदनात नमूद आहे. रोशनबाईने तळणी येथील आपली एक हेक्टर ७२ आर जमीन मुलीला दिली. त्याचे मृत्यू पत्रही (बक्षीस पत्र) करून दिले गेले. ही जमीन जावई शेर अली अकबरी अली जीवाणी हे वहिती करतात. मात्र त्यांच्याही कामात अडथळा निर्माण करून त्यांना शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, पोलिसांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधाच्या बळावर खोट्या प्रकरणात गोवण्याची धमकी देणे असे प्रकार सुरु आहे. घाटंजी पोलीस प्रतिसाद देत नसल्याचे पाहून सदर वृद्धेच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. त्यांनी तत्काळ ठाणेदाराला फोन लावून झाडाझडती घेतली. तुमच्या २० फुटावर जुगार अड्डा चालतो तो बंद का करीत नाही, अशा शब्दात एसपींनी घाटंजी पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर घाटंजी ठाणेदारांनी तक्रारकर्त्याला रात्री फोन करून ‘तुमचे नेमके प्रकरण काय’ अशी विचारणा केली. मात्र त्यानंतर त्यांचा पुन्हा संपर्क नाही. (जिल्हा प्रतिनिधी)इच्छामरणाची राष्ट्रपतींकडे परवानगी मागितली जन्मदात्या मुलानेच मातेचा वेगवेगळ्या माध्यमातून छळ चालविला आहे. आपला हा मुलगा कुपुत्र निघाला असून पोलीसही त्यालाच सहकार्य करतात. त्याचा जुगार अड्डा चालत असल्याने त्याच्याकडून नियमित हप्ते घेतात. त्यामुळे पोलिसांकडून कारवाईची आशा सोडल्याचे नमूद करीत रोशनबाई हिराणी यांनी सोमवारी थेट भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठवून इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी विनवणी केली आहे. पोलिसांना फिर्यादी नव्हे आरोपी जवळचे वाटतातरोशनबाईच्यावतीने त्यांचे जावई १९ मे रोजी सकाळी ८ वाजता घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. सुरुवातीला जुगार अड्डा व्यावसायिक नुरुद्दीनविरुद्ध तक्रार असल्याने ती घेणेच टाळले. एवढेच नव्हे तर फिर्यादीसमोरच नुरुद्दीन यांना फोन करून उपस्थित जमादाराने तुझ्या विरोधात तक्रार आल्याचे अगदी प्रेमळ भाषेत सांगितले. तक्रारीनुसार भादंविचे कलम लावणे बंधनकारक असताना सदर जमादार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ११० अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करून प्रकरण मिटविण्याच्या तयारी होते. तशी विनंतीही या जमादाराने फिर्यादीला केली. पोलिसांना आरोपी जवळचे असल्याचे लक्षात येताच फिर्यादीने थेट पालकमंत्र्यांकडे चक्रे फिरविली. तेथून घाटंजी पोलीस ठाण्यात फोन फिरताच अखेर नाईलाजाने का होईना नुरुद्दीनविरुद्ध गुन्हा नोंदविला गेला.