शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

फुलशेतीने शेतकऱ्यांना केले निराश

By admin | Updated: November 7, 2016 01:07 IST

दसरा-दिवाळीत झेंडूच्या फुलांना शहरी व ग्रामीण भागात मोठी मागणी असते. त्यामुळे फुलशेती केल्यास चांगला भाव

सणासुदीत भाव गडगडले : परप्रांतातील फुलांची आवक वाढल्याने शेतकरी हतबल पुसद : दसरा-दिवाळीत झेंडूच्या फुलांना शहरी व ग्रामीण भागात मोठी मागणी असते. त्यामुळे फुलशेती केल्यास चांगला भाव मिळेल या आशेवर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली होती. परंतु या दोन्ही सणांच्या काळात बाजारात झेंडूची प्रचंड प्रमाणात आवक झाल्याने फुलांचे दर कोसळले. परिणामी शेतकऱ्यांची निराशा झाली. दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. वेगवेगळे दुकानांची यंदा नव्याने भर पडली. या काळात पूजा, उत्सवानिमित्त झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने झेंडूची लागवड केली आहे. परंतु फुलांच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. पुसद परिसरात अनेक शेतकऱ्यांनी यंदा फुलशेती केली होती. दसरा सणाला झेंडू फुलाचे दर अक्षरश: ५० ते १० रुपये किलो प्रमाणे विक्री करावी लागली. दसऱ्याच्या दिवशी तर आवक वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी झेंडूची फुले अक्षरश: रस्त्यावर फेकली होती. दिवाळीच्या सणातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. दिवाळीच्या आठवडाभरात सुरुवातीला १० ते १५ प्रति किलो भाव मिळाला. मात्र पुन्हा दरात घसरण व आवक झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांना ४ ते ५ रुपये प्रति किलोप्रमाणे विक्री करावी लागली. त्यामुळे फुलशेती संकटात सापडली आहे. यंदा या दोन्ही सणांच्या काळात फुलशेत उत्पादकांचे दिवाळी निघाले. पुढील वर्षी फुलशेती करण्याबाबत फेरविचार करावा लागणार असल्याचे अनेकांना बोलून दाखवले आहे. (तालुका प्रतिनिधी)