शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बनावट मृत्युपत्राद्वारे सुनेची फसवणूक

By admin | Updated: September 27, 2014 23:22 IST

मुलाचे बनावट मृत्यूपत्र तयार करून मालमत्तेतून सून आणि नातवाला वगळून नातेवाईकांनीच त्यांची फसवणूक केली. ही घटना पांढरकवडा येथे घडली. सुनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सासूसह चौघांवर

पांढरकवडाची घटना : चौघांवर गुन्हा दाखलयवतमाळ : मुलाचे बनावट मृत्यूपत्र तयार करून मालमत्तेतून सून आणि नातवाला वगळून नातेवाईकांनीच त्यांची फसवणूक केली. ही घटना पांढरकवडा येथे घडली. सुनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सासूसह चौघांवर गुन्हा नोंदविला. या घटनेने विविध चर्चेला उधाण आले आहे. अरुंधती नीलेश निब्रड रा.खामला असे तक्रारकर्त्या सुनेचे नाव आहे. तिचे पती नीलेश निब्रड यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी संपत्तीच्या वाट्यासंबंधी कुठलेही कागदपत्र तयार केले नाही. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेत पत्नी अरुंधती आणि मुलगा कायद्याने वाटेकरी ठरतो. त्यामुळे त्यांना संपत्ती मिळू नये, यासाठी सासू ज्योती बबनराव निब्रड आणि तिचे तीन नातेवाईक सर्व रा.पांढरकवडा यांनी नीलेश निब्रड यांचे बनावट मृत्युपत्र तयार केले. या मृत्यूपत्रात अरुंधती आणि त्यांच्या मुलाला संपत्तीतून वगळण्यात आले. ही बाब लक्षात येताच अरुंधती निब्रड यांनी या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ज्योती निब्रड यांच्यासह चौघांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. वृत्त लिहिस्तोवर कुणालाही अटक झाली नव्हती. पोलीस मागावर असल्याचे सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)