बनावट मृत्युपत्राद्वारे सुनेची फसवणूक

By Admin | Updated: September 27, 2014 23:22 IST2014-09-27T23:22:22+5:302014-09-27T23:22:22+5:30

मुलाचे बनावट मृत्यूपत्र तयार करून मालमत्तेतून सून आणि नातवाला वगळून नातेवाईकांनीच त्यांची फसवणूक केली. ही घटना पांढरकवडा येथे घडली. सुनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सासूसह चौघांवर

Fraud of falsehood by a fake doctrine | बनावट मृत्युपत्राद्वारे सुनेची फसवणूक

बनावट मृत्युपत्राद्वारे सुनेची फसवणूक

पांढरकवडाची घटना : चौघांवर गुन्हा दाखल
यवतमाळ : मुलाचे बनावट मृत्यूपत्र तयार करून मालमत्तेतून सून आणि नातवाला वगळून नातेवाईकांनीच त्यांची फसवणूक केली. ही घटना पांढरकवडा येथे घडली. सुनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सासूसह चौघांवर गुन्हा नोंदविला. या घटनेने विविध चर्चेला उधाण आले आहे.
अरुंधती नीलेश निब्रड रा.खामला असे तक्रारकर्त्या सुनेचे नाव आहे. तिचे पती नीलेश निब्रड यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी संपत्तीच्या वाट्यासंबंधी कुठलेही कागदपत्र तयार केले नाही. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेत पत्नी अरुंधती आणि मुलगा कायद्याने वाटेकरी ठरतो. त्यामुळे त्यांना संपत्ती मिळू नये, यासाठी सासू ज्योती बबनराव निब्रड आणि तिचे तीन नातेवाईक सर्व रा.पांढरकवडा यांनी नीलेश निब्रड यांचे बनावट मृत्युपत्र तयार केले. या मृत्यूपत्रात अरुंधती आणि त्यांच्या मुलाला संपत्तीतून वगळण्यात आले. ही बाब लक्षात येताच अरुंधती निब्रड यांनी या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ज्योती निब्रड यांच्यासह चौघांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. वृत्त लिहिस्तोवर कुणालाही अटक झाली नव्हती. पोलीस मागावर असल्याचे सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Fraud of falsehood by a fake doctrine